आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्युंदाईची नवी एलांट्रा भारतात लाँच, माेबाइलद्वारे नियंत्रणसह अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ह्युंदाई माेटारने नवी एलांट्रा फेसलिफ्ट कार भारतीय बाजारपेठेत आणली आहे. बीएस-६ इंजिनसह असलेल्या या कारची किंमत १५.८९ लाख रु. आहे. कारमध्ये ह्युंदाईची ब्लुर्लिक टेक्नाॅलाॅजीचा वापर केला आहे. म्हणजे तुम्हाला कारचा माेबाइल अॅक्सेस मिळेल. त्यामुळे तुम्ही घरबसल्या माेबाइलद्वारे कार नियंत्रित करू शकाल. एलाट्रा तीन प्रकारासाेबत मॅन्युअल आणि आॅटाेमॅटिक व्हेरिएंटमध्ये येईल. या कारची खरेदी ब्लूलिंक सब्सक्रिप्शन, तीन वर्षे राेड साइड असिस्टंट, ३ वर्षे मॅपकेअर अपडेटची ऑफर मिळेल. कार पाच रंगात- मरीन ब्ल्यू, पाेलर व्हाइट, टायफून सिल्व्हर, फँटम ब्लॅक आणि फेयरी रेडमध्ये येईल. नव्या २०१९ एलांट्रामध्ये षटकाेनी ग्रिल दिले आहे, समाेरचा भाग आणखी आकर्षक दिसताे.