आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, नेहमी शरद पवारांसोबतच असेल, 'त्या' दिवसावर धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांनी 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

मुंबई- अजित पवारांनी 23 नोव्हेंबरला बंडखोरी करत भाजपला समर्थन दिले आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार सोबत होते. त्या आमदारांमध्ये धनंजय मुंडेंही होते, अशा अफवा उडाल्या होत्या. पण, यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. "मी राष्ट्रवादीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी शर पवारांसोबतच आहे", असे मुंडेंनी स्पष्ट केले.यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, "मी राष्ट्रवादीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी शरद पवारांसोबतच आहे. त्यादिवशी घटना घडली तेव्हा मी एक वाजेपर्यंत झोपलेला होतो. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मला माध्यमांसमोर यायला वेळ लागला. निवडणूक सगळ्यांनी एकत्र लढवली. पण त्यानंतर अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे अजित पवार यांच्यावर प्रेम आहे ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी घेतलेल्या निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. माझ्या बंगल्यावर काय झालं हे मला माहित नाही, तो सार्वजनिक आहे. मला याबद्दल काहीच माहित नव्हतं."ग्रँड हयात हॉटेलमध्ये सर्व 162 आमदारांनी एकजूट राहण्याची घेतली शपथ  
 
महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगवेगळी वळणं घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार फुटाफुटीची भीती काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 162 आमदारांची परेड ग्रँड हयात हॉटेलमध्ये घेण्यात आली. तसेच, यावेळी त्यांना आम्ही एकजूटीने राहू अशी शपथही देण्यात आली.

आम्ही सरकार स्थापन करू- शरद पवार


शरद पवार म्हणाले की, भाजपला समर्थन देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हा अजित पवारांचा वयक्तिक निर्णय होता, यात पक्षाचा काहीच हात नाहीये. अजित पवारांच्या बंडखोरीमागे माझा काहीच हात नाहीये. माझा त्यांच्याशी काहीच संपर्क झालेला नाहीये. त्यांची पक्षातून हकालपट्टी करायची का नाही, हा पक्षातील सर्व नेते मिळून घेतील. यात काही दुमत नाहीये की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करेल.

भाजपसोबत जाण्याच काही महिन्यांपूर्वीच ठरलं होतं- अजित पवार


"पक्षातील जेष्ठ नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपसोबत जायचे, असे काही महिन्यांपूर्वीच ठरले होते. त्यासंदर्भात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या. पण, मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय", असे अजित पवारांनी सांगितले. तसेच, गुप्त मतदार झाले तर आपण जिंकणार, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. "मला आमच्या नेत्यांकडून गप्प बसायला सांगितले जात आहे, पण वेळ आल्यावर सर्व बोलणार", असा इशारा अजित पवारांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...