आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी एका पक्षात जाणार असल्याची चर्चा पण मी शरद पवार यांचाच कार्यकर्ता : राजेश टोपे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री - जिल्ह्यात सध्या मी एका पक्षात जाणार असल्याची चर्चा मला दबक्या आवाजात ऐकू येत आहे. परंतु नैतिक,नीतिमत्तेच्या आधारावर मी येथेच राहणार आहे. काही कारणांसाठी काही जण इकडेतिकडे जात असतील, मी शरद पवार यांचाच कार्यकर्ता आहे, असे व्हायरल  चर्चेला आ. राजेश टोपे यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ   कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. 

कर्मयाेगी अंकुशराव टोपे समर्थ  कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला आ. टोपे, निसार देशमुख, मनोज मरकड, उत्तम पवार, सतीश टोपे, श्रीरंग पैठणे, संभाजी टोपे, किरण तारख, सतीश होंडे, बाबासाहेब बोबले यांची उपस्थिती होती.   हेवेदावे विसरून कामाला लागावे असे आवाहन केले.
 

शुक्रवारी पवार जालन्यात 
जालना । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे २० सप्टेंबर रोजी जालना दौऱ्यावर येत आहेत. जालन्यातील अग्रसेन भवन येथे सकाळी १० वाजता येथे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, युवक राष्ट्रवादी, विद्यार्थी, युवती या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवडणुकीविषयी चर्चा होणार आहे.  महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, आ.राजेश टोपे,  अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, इक्बाल पाशा यांच्या उपस्थितीत चर्चा हाेणार आहे.  दरम्यान या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन केले.