आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Am Ayodhya Talking..., 'I Want To See All The Stars In The Sphere Of Religion Shining'

मी धर्माच्या अवकाशातील सर्व तारे चमकताना पाहू इच्छिते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. धनंजय चोपडा


सब नर करहि परस्पर प्रीति।
चलहि स्वधर्म निरत श्रुति नीति।।


रामचरित मानसमधील या ओळी सार्थ ठरवणारी अन् आपल्या रामभक्तीत लीन होणारी मी अयोध्या बोलत आहे. ते तुलसीचे राम असो की कबीराचे; मला दोन्हीही प्रिय आहेत. अल्लामा इक्बाल यांचे माझ्या प्रभू रामाला इमामे हिंद संबोधणेही मला भावले होते. भगवान बुद्धाने इथे येऊन रामाची आपल्या पद्धतीने व्याख्या करणेही त्यात आले. खरं सांगू, भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे मी. माझ्या अंतरंगात शेकडो वर्षांपासून तीर्थयात्रा प्रवाहित होतात. नदी, लोक, मिथक, श्रद्धा आणि विश्वासाच्या विखुरलेल्या स्थितीस एकत्र आणण्याचे काम मीच करते. त्यामुळे प्रत्येक वादळ झिडकारत आजही मी आपलेपणाची जाणीव करून देत आहे.


मी ती अयोध्या आहे, जिने कायम वाईटांवर चांगल्याच्या विजयासाठी प्रार्थना केली. मी शरयूच्या लाटांसोबत भक्तांच्या मन-मेंदूत शांत चित्ताने प्रवाहित होऊ इच्छिते. आज तर मी आणखी शांत आहे. साऱ्या जगाचे लक्ष माझ्याकडे आहे. प्रत्येकाच्या मनाला एक अनामिक भीती सतावत आहे. मात्र, सत्य तर हे आहे की, इथे रोजच्या प्रमाणे मंत्रोच्चार आणि अजानचे समूहगान सुरू आहे. येथील हवेत मिसळलेला हवनचा आणि चुलीचा धूर आम्हीच जगाला शांततेची व्याख्या देत असल्याचे साक्ष देत आहे. मी धर्माच्या आकाशातील सर्व ताऱ्यांना चकाकताना पाहू इच्छिते आणि त्यामुळेच स्वत:ला राजकारण आणि सत्तेपासून दूर ठेवण्याची विनंती करत असते. जो कोणी मला जवळून ओळखतो त्याला माझ्या असण्यातील अढळपणावर विश्वास असतो.


मी ती अयोध्या आहे, जिला अनेकदा सत्तेच्या बदलत्या वळणाने त्रासच दिला नाही तर हैराणही केले. बऱ्याच ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कथा सामावलेल्या स्थितीत मी अनेकदा हवेचे रंग बदलताना पाहिले. अनेकदा हे रंग गडद होत गेल्यावरही त्रास झाला. मात्र, प्रत्येक वेळी मला आपल्यात सामावणाऱ्यांनी कधी रंग बदलला नसल्याचेही दिसले. ते शांततेची नवनवी व्याख्या करत राहिले आणि प्रेमाच्या रंगात न्हात राहिले. अनेक वर्षांच्या सहवासात परका कुणीच नाही, सर्व आपलेच आहेत या भावनेतून चिंब होत राहिले. आता हे पाहा, काही दिवसांपूर्वी माझी परिक्रमा करणारी श्रद्धा ही संस्कृती आणि परंपरेने जगू इच्छित असल्याचे दर्शवित आहे.


आपापल्या पद्धतीच्या परिक्रमेत प्रत्येक धर्माच्या लोकांचा सहभागच याला बळकटी देताे. वास्तवात भारतीय संस्कृतीचे बहुकेंद्रीय स्वरूप समजून घ्यायचे असेल तर माझ्यापर्यंत यावेच लागेल. मी न्यायाची आपली स्वतंत्र व्याख्या देणारी अयोध्या आहे. न्यायासाठी सर्वस्व त्याग करण्याची साक्षीदार अयोध्या. कुटुंबातील आदर्श पद्धती सांगणारी अयोध्या. संयम राखण्याचा अजोड वस्तुपाठ देणारी अयोध्या. प्रत्येक शतकात प्रत्येक वेळी धैर्याची परीक्षा देणारी अयोध्या.  संपूर्ण जगासाठी शांततेची प्रार्थना करणारी अयोध्या. सद्भावना आणि सौहार्दाचे प्रतीक होणारी अयोध्या.


सोबत येण्याबरोबर त्यावर ठाम राहण्याचे आवाहन करणारी अयोध्या. वर्तमानासोबत भविष्यही सुखकर करण्यात गुंतणारी सर्वांचीच अयोध्या. जय-पराजयाचे प्रत्येक आडाखे नाकारत आपल्याच धुंदीमध्ये रमणारी अयोध्या.... मी अयोध्या आहे. स्वकीयांची अयोध्या. आपलेपणाची अयोध्या.

(डॉ. धनंजय चोपडा. प्रभारी, सेंटर ऑफ मीडिया स्टडीज, अलाहाबाद विद्यापीठ)