आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला दिल्लीच्या राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त रस, भाजप नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 26 ला राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे

मुंबई- भाजपने राज्यसभेसाठी आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली. यात उदयनराजे, रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी भाजप एकनाथ खडसेंना उतरवणार असल्याची चर्चा होती, पण तसे झाले नाही. यावर खडसेंनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. "राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. पण, मला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती," असे खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ''पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा होती, पण मला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती. मुळात मला राज्याच्या राजकारणात जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळेच माझ्या नावाचा विचार पक्षाने केला नसावा.''

डॉ. कराड यांना भाजपकडून संधी


महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या सात जागांसाठी येत्या 26 मार्चला निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून या निवडणुकीत तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यात रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा काल झाली. तिसऱ्या उमेदवारावरासाठी भाजपमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री हंसराज अहिर व पुण्याचे भाजप खासदार संजय काकडे यांच्या नावांची चर्चा होती. पण, यात एकनाथ खडसेंचे नाव आघाडीवर होते. या सर्वात भाजपने सर्वच नेत्यांना डावलून पंकजा मुंडे गटाच्या आणि मराठवाड्यातील भाजपचा चेहरा असलेले डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...