आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • I Am Not Tired, I Know More Than Shinde Pawar; Shinde Made The Move; That Said, There Was Aversion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी थकलाे नाही, शिंदेंपेक्षा मला अधिक कळते - पवार; शिंदेंनी केले घूमजाव; म्हणाले, विपर्यास झाला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - काँग्रेस-राष्ट्रवादी आज वेगळे असले तरी उद्या पुन्हा एकत्र येण्याचा विचार करतील, असे सांकेतिक वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी साेलापुरात केले हाेते. त्यावरून दाेन्ही काँग्रेस विलीनीकरणाची चर्चाही सुरू झाली हाेती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी त्याचे खंडन केले.

जळगावात पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, ‘शिंदे यांच्यापेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते. शिंदे त्यांच्या पक्षाविषयी बाेलले असतील. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. त्यांच्यापेक्षा मला निश्चितच राष्ट्रवादीबद्दल अधिक माहिती आहे. मी थकलेलाे नसल्याने त्यांच्या वक्तव्याला अर्थ नाही,’ असे स्पष्टीकरण पवारांनी देत या विषयाला पूर्णविराम दिला. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात सुशीलकुमार शिंदें यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘शिंदे यांचे ते  मत वैयक्तिक आहे. ते स्वत:च थकलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थकलेले नसून, हे दाेन्ही पक्ष कधीच थकणार नाहीत. दाेन्ही पक्षांचे एकत्रीकरण करावयाचे की नाही हा निर्णय दोन्ही पक्षांतील वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
 

शिंदेंनी केले घूमजाव; म्हणाले, विपर्यास झाला
बुधवारी शिंदेंच्या वक्तव्यावर एकच चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र त्यांनी घूमजाव केले. ‘शरद पवार ८० व्या वर्षीही प्रचार करत असल्याचा संदर्भ देऊन मी ते थकल्याचा उल्लेख केला हाेता. पण, माध्यमांनी व विराेधकांनी त्याचा विपर्यास केला. मी काल कार्यकर्त्यांची भाषा बाेललाे. दाेन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल. आपण एकत्र आलाे तर विराेधकांची आपल्यासमाेर उभे राहण्याची हिंमतही हाेणार नाही,’ असे मी म्हणालाे हाेताे,’ असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...