आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री, फडणवीस यांचे मोरया फेस्टिव्हलमध्ये प्रतिपादन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आई, वडील, शिक्षक यांच्याकडून आणि महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या माध्यमातून मला संस्काराचे धडे मिळाले. संस्कार म्हणजे विवेक, चांगल्या वाईटातील अंतर समजणे म्हणजेच संस्कार होय. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. प्रत्येक काम करताना मी सकारात्मक विचारानेच केले. त्यामुळेच ‘मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’ आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिप्पणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी शनिवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘मोरया यूथ फेस्टिव्हल २०२०’ आणि स्मृतीचिन्हाचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी मंत्री बाळा भेगडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आदी उपस्थित होते.      यावेळी सोलापुरकर आणि पटवर्धन यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. तसेच, फडणवीस यांना युवक, युवतींनी प्रश्न विचारले त्यांची फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी फक्त समस्या मांडल्या नाहीत तर त्या समस्यांवर उपाय सांगितले आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन काम केले. आजही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, असे विचारताच तरुणाईच्या डोळ्यांपुढे माझीच प्रतिमा दिसते. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी दिली.