आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pawan Jallad: Meerut Pawan Jallad Reaction After Court Verdict On Nirbhaya's Rapist Killers To Hang At 7am On January 22

मी पाच मुलींचा पिता आहे, त्या नराधमांना फाशी देऊन मला खूप आनंद मिळेल- जल्लाद पवन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकाने(तुरुंग) तिहार प्रशासनाच्या मागणीवर जल्लाद पवनचे नाव दिले होते

मेरठ- निर्भयाच्या चारही दोषींना 22 येत्या जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येईल. दिल्लीच्या पटियाळा कोर्टाने मंगळवारी त्या चौघांचे डेथ वॉरंट जारी केले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेशच्या तुरुंग पोलिस महासंचालकांना पत्र लिहून जल्लादला तयार करण्याची मागणी केली आहे. मेरठचे जल्लाद पवन यावर म्हटले की, मी पाच मुलींचा पिता आहे. त्या नराधमांना फाशी देऊन मला आणि निर्भयाच्या कुटुंबीयांना आनंदच होईळ. यामुळे समाजात अशाप्रकारचे गुन्हे न करण्याचा संदेशही जाईल.जल्लाद पवन पुढे म्हणाले की, निर्भयाच्या चारही दोषींना माझ्याहातून फाशी देण्याची माहिती मलाही मिळाली आहे. जर मला बोलवण्यात आले तर मी तयार आहे. चौघांना फाशी देण्याची हिम्मत माझ्यात आहे. मला सरकारी आदेश मिळाल्यावर मी लगेच दिल्लीला रवाना होईल.

फाशी दिल्यावर आधी मानेचे हाड मोडते, नंतर मेंदू सुन्न होतो

जल्लाद पवन म्हणाले की, ज्या कैद्याला फाशी द्यायची असते, त्याला फाशी देण्याच्या जागी अर्ध्या तासापूर्वी आणले जाते. तख्त्यावर चढवल्यानंतर त्याचे हात आणि पाय बांधले जातात. त्यानंतर जल्लाद काळा कपडा तोंडावर टाकून फास दिला जातो आणि ठरलेल्या वेळेवर कैद्याला फाशी दिली जाते.