Worldcup2019 / World Cup 2019; महेंद्र सिंह धोनीने दिला कानमंत्र, शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतली हॅट्रिक, म्हणाला- 'माही भाईने जे सांगितले तेच केले...'


विश्वचषतात हॅट्रिक घेणारा शमी दुसरा भारतीय गोलंदाज आहे
 

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 05:06:32 PM IST

स्पोर्ट डेस्क- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगानिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रीक घेतली. या सामन्यानंतर त्याने आपली प्रतिक्रीया दिली. तो म्हणाले की, सामन्यादरम्यान महेंद्र सिंह धोनीने सल्सा दिला की, हॅट्रिक चेंडूसाठी यार्कर टाक आणि त्यानंतर तिसरी विकेट घेतली.

शमीने 40 ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या. सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणाला की, रणनिती एकदाम साधी यॉर्कर टाकण्याची होती. धोनीनेही यॉर्कर टाकण्याचा सल्ला दिला होता. धोनी म्हणाला होती की, 'आता काहीच बदल करून नकोस आणि यॉर्कर टाकून हॅट्रिक घे.’


शमी म्हणाला की, हॅट्रिक एक मोठे यश आहे आणि तुम्हाला यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे मला जे सांगितले गेले तेच मी केले. शमीने अफगानिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली, विश्वचषकात 2019 च्या पहिल्याच सामन्यात त्याने हॅट्रिक घेतली आहे.

शमी चेतन शर्मानंतर विश्वचषकात हॅट्रिक दुसराच भारतीय गोलंदाज आहे. 1987 विश्वचषकात चेतन शर्माने न्यूजीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती. 50 ओवर्सच्या विश्वचषकाच्या इतिहासातील ही 10वी हॅट्रिक आहे.

X
COMMENT