आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Had Talked To Sanjay Raut About A Compromise. I Suggested Him A Formula Of 3 Years CM From BJP And 2 Years CM From Shiv Sena, Says Ramdas Athwale

3 वर्षे भाजप तर 2 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, रामदास आठवलेंनी संजय राऊतांना सांगितला नवा फॉर्म्युला  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी सोमवारी सांगितले की, अजूनही त्यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होईल, अशी अपेक्षा आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ते भाजपसोबत चर्चेमध्ये झालेल्या तडजोडीबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बोलले आहेत.संजय राऊत यांना तीन-दोन फॉर्म्युला सुचविला
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "मी संजय राऊतजींशी तडजोडीबद्दल बोललो होतो. मी त्यांना 2-3 वर्षांचा फार्म्युला सुचवला आहे. यात 2 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री." पुढे ते म्हणाले की, जर भाजप या फॉर्म्युल्यावर ठाम असेल, तर संजय राऊत आपल्या पक्षासोबत चर्चा करायला तयार आहेत.

यापूर्वी रामदास आठवले म्हणाले होते की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाची चिंता न करण्यास सांगितले आहे. तसेच, भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, असा विश्वासही त्यांनी दिला. तसेच, "मी अमित भाईंना सांगितले की, जर त्यांनी मध्यस्थी केली तर एखादा मार्ग नक्की सापडेल.

बातम्या आणखी आहेत...