आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आय लीग फुटबॉल : काश्मिरी खोऱ्यात एक अंश तापमान; बर्फ व पावसामध्ये रिअल काश्मीरने गोकुलम केरळला 1-0 ने हरवले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर । फुटबॉल चाहत्यांसाठी आयकॉनिक अनुभव राहिला. काश्मीरमध्ये एक अंश सेल्सियस तापमानातील गुलाबी थंडी व बर्फाळ पावसात कश्मीर आणि गोकुलम केरळ यांच्यात सामना रंगला. रिअल काश्मीरने सामन्यात १-० ने विजय मिळवला. सामन्यातील एकमेव गोल ५१ व्या मिनिटाला स्ट्रायकर नोहेरे क्रिजोने केला. हा रिअल काश्मीरचा १६ सामन्यांतील नववा विजय ठरला. यामुळे रिअल काश्मीर लीगच्या तालिकेत अव्वलस्थानी पोहोचला. त्यांचे एकूण ३२ गुण झाले. त्यांनी सत्रात ५ सामने बरोबरीने खेळले आणि दाेन सामने गमावले. रिअल काश्मीर पहिल्यांदाच आय लीगमध्ये खेळत आहे. तालिकेत दुसऱ्या स्थानावरील चेन्नई सिटी एफसीने १४ सामन्यांत २९ गुणांची कमाई केली. त्यांनी ९ विजय, २ पराभव व ३ सामने बरोबरीत राखले. लीगमध्ये प्रत्येक संघ प्रत्येकी २० सामने खेळेल. 

 

पहिल्या हाफमध्ये बर्फ; दुसऱ्या हाफमध्ये पाऊस 
टीआरसी मैदानावर सामना सुरू होण्यापूर्वी हलका बर्फाचा पाऊस सुरू झाला. पहिला हाफ बर्फात खेळवण्यात आला. त्यानंतर दुसरा हाफ सुरू होताच मोठा पाऊसदेखील सुरू झाला. मैदानावर पास करण्यासाठी अडचण येत होती, त्यामुळे खेळाडू एरियल रूटचा वापर करत होते. मात्र, यानंतरही खेळ थांबवण्यात आला नाही. या वातावरणात खेळाडूंना पाहून प्रेक्षकदेखील उत्साहित होत होते. कोणी छत्री घेऊन, तर कोणी बॅनरचा आसरा घेत सामना पाहत होते. 

बातम्या आणखी आहेत...