आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकाश खरे, भोपाळ - 'मी लहानपणापासून क्रिस हेम्सवर्थचा चाहता आहे. संपूर्ण अव्हेंजर्स सिरिजमध्ये मला त्यांचीच भूमिका खूप दमदार वाटली आणि ज्या वेळी मला समजले की, मी माझा आवडता सुपरहीरो 'थॉर'सोबत काम करणार आहे तर मी वेडाच झालो. मला त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. त्यांच्यामुळे मी अव्हेंजर्स सिरीजचे दिग्दर्शक जो रुसोलादेखील भेटलो. त्यांनी मला अॅव्हेंजर्स सिरीजच्या आगामी चित्रपटात घेणार असल्याचे वचन दिले आहे. मी तुम्हाला आगामी 'अॅव्हेंजर्स'मध्ये दिसण्याची शक्यता आहे.' असे 16 वर्षीय बालकलाकार रुद्राक्ष जयस्वालचे म्हणणे आहे. ज्याने आताच चित्रीकरण झालेला नेटफ्लिक्सचा चित्रपट 'एक्स्ट्रॅक्शन' मध्ये क्रिस हेम्सवर्थ सोबत काम केले आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगताना रुद्राक्ष सांगतो, 'क्रिसमुळे सेटवर जादुई वातावरण निर्माण होते. त्यांनी मला प्रत्येक दृश्यासाठी मदत केली आहे. ते मला व्हॉइस मॉड्युलेशनपासून ते अॅक्शन आणि अॅक्टिंगच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी सांगत होते. दिग्दर्शकांना माझ्याकडून जे अपेक्षित हाेते ते अगदी सोप्या भाषेत समाजवून सांगायचे. सेटवर ते मला लिटिल लिजंेड नावाने हाक मारायचे. चित्रपटासाठी आम्ही अहमदाबाद आणि चार महिने बँकाॅकमध्ये चित्रीकरण केले. सेटवर आम्ही सोबत फुटबॉल खेळायचो. मी त्यांच्याकडून बॉलिवूडमधील कित्येेक हिंदी डायलॉगही बोलून घेतले. शूटिंगच्या काळआत माझी आई माझ्यासोबत होती.'
रुद्राक्ष सांगतो, 'या चित्रपटासाठी मी अजय देवगणचा 'तान्हाजी' सोडला. मला त्या चित्रपटात अजयच्या बालपणीची भूमिका करायची होती. यासाठी माझे प्रशिक्षणही झाले होते, परंतु 'एक्स्ट्रॅक्शन'च्या डेट्ससोबत 'तान्हाजी'च्या डेट्स मॅच होत नव्हत्या. म्हणून मला हा चित्रपट सोडावा लागला. या चित्रपटाचे पूर्वी ढाक नाव होते परंतु आता 'एक्स्ट्रॅक्शन'केले आहे. मालिकेमध्ये एका गँगस्टरचा मुलाची माझी भूमिका आहे. ज्याचे दुसऱ्या गँगचे गुंड अपहरण करतात. क्रिस हेम्सवर्थचे पात्र मला वाचवते. हा चित्रपट या वर्षी 24 एप्रिलला प्रदर्शित हाेणार आहे.'
'आम्ही अहमदाबादला एक अवघड दृश्य चित्रित करीत होतो. क्रिसला माझा शर्ट धरून मला रुमच्या बाहेर ओढायचे होते. आम्ही हे दृश्य 9 वेळा केले असेल. ज्या वेळी त्यांनी मला ओढले तर मी पाहिले की माझ्या छातीवर त्यांच्या नखांमुळे ओरबाडले होते. ज्या वेळी हे मी त्यांना सांगितले, तर ते माझ्या आईला रडतरडत सॉरी म्हणाले. यावर मी म्हणालो, काही होत नाही माझ्या छातीवर सुपरहीरोचा ऑटोग्राफ मिळाला आहे. ते मला म्हणाले की, ज्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होईल तर तू हॉलिवूडमध्ये नक्की प्रयत्न कर. मला हॉलिवूडमध्ये काम करून अॅव्हेंजर बनायचे आहे आणि हा माझा ड्रीम रोल आहे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.