Home | Business | Gadget | i-phone-4 comes in india

आयफोन-४ आला भारतात

Bhaskar Network | Update - May 27, 2011, 04:09 PM IST

मोबाईलच्या जागतिक बाजारपेठेतील क्रमांक दोनची बाजारपेठ असलेल्या भारतात आजपासून आयफोन-४ मोबाईल प्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे

  • i-phone-4  comes in india

    मोबाईलच्या जागतिक बाजारपेठेतील क्रमांक दोनची बाजारपेठ असलेल्या भारतात आजपासून आयफोन-४ मोबाईल प्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे. 'भारती एअरटेल' ने आयफोन-४ भारतातील मोबाईल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे.

    सद्यस्थितीत भारतातील ३४ शहरांमधून 'आयफोन-४ ' उपलब्ध होणार आहे. बाजारात असलेल्या इतर मोबाईल कंपनीच्या स्र्पधेत 'आयफोन-४' चे स्वतंत्र अस्तिव राहिल असा विश्वास एअरटेल चे कार्यकारी अधिकारी (पश्चिम बंगाल व ओरिसा) पी.डी.शर्मा यांनी सांगितले.

    जगातील इतर देशात 'आयफोन-४' चे आगमन हे वर्षभरापूर्वीच झाले होते. भारतात '३जी' मोबाईल सेवा उशिरा सुरू झाल्यामुळे 'आयफोन-४' चे आगमन उशिराने झाले असे त्यांनी सांगितले.

    ऍपलच्या 'ए४' या ऑपरेटींग सिस्टिमद्वारे या फोनची निर्मिती करण्यात आली आहे. 'आयफोन-४' या सोळा जीबी क्षमतेच्या हॅंडसेटची किंमत ही ३४,५०० असून ३२ जीबी क्षमतेच्या 'आयफोन-४' ची किंमत ही ४०,९०० अशी आहे.Trending