आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'I Think I Can Get A Beautiful Bouquet From North Korea Instead Of Missile At Some Time: President Donald Trump

'मला वाटते एखादेवेळी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्राऐवजी मला सुंदर पुष्पगुच्छही मिळू शकतो : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील आण्विक चर्चा सध्या स्थगित झाली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा नाताळच्या निमित्त लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी करू शकतात, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना वाटते. त्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच्या विनोदी शैलीत म्हणाले, मला वाटते एखादेवेळी उत्तर कोरिया क्षेपणास्त्राऐवजी मला सुंदर पुष्पगुच्छही पाठवू शकेल. तत्पूर्वी, अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाताळच्या सुट्यांत अनेक क्षेपणास्त्र चाचणी घेऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

मंगळवारी फ्लोरिडाचे ऐतिहासिक ठिकाण मॅर-ए-लागोला ट्रम्प यांनी भेट दिली होती. तेव्हा नाताळच्या या काळात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली तर ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. मला क्षेपणास्त्राच्या ऐवजी ते पुष्पगुच्छही पाठवतील, असेही होऊ शकते, असे ट्रम्प म्हणाले. मला एखादेवेळी चांगली भेटवस्तूही मिळू शकेल. मॅर-ए-लोगमध्ये कार्यक्रमस्थळी एका हॉलमध्ये ट्रम्प निवांत दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव किंवा चिंता नव्हती. याप्रसंगी ट्रम्प यांनी व्हिडिआे कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमेरिकेच्या लष्कराला संबोधित केले. ट्रम्प म्हणाले- माझ्यासाठी प्रत्येकाकडे काही ना काही सरप्राइज असते. परंतु बघूया काय होते ते? आम्ही सरप्राइजचा शोध लावू आणि यशस्वीपणे त्याचा निपटाराही करू. त्यांची चाल कशी आहे, त्यानुसार मी त्यांना हाताळतो. ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही क्षणी उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊ शकतो. ट्रम्प यांनी या मुद्द्यावर चीनचे राष्ट्रपती व जपानच्या पंतप्रधानांशीदेखील चर्चा केली होती.

हुकूमशहा किम जाेंग उन यांनी दिली होती 'नाताळ' भेटीची धमकी

किम जाेंग उन यांनी अमेरिकेने लादलेल्या निर्बंधाला हटवले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर 'नाताळ भेट' देण्याचा इशारा दिला होता. त्यावर ट्रम्प यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. वास्तविक उत्तर कोरियाकडून वाढत असलेल्या संकटामुळे व्हाइट हाऊसच्या चिंतेत भर पडल्याचे मानले जाते. येथे घडामोडींना वेग आला आहे. कारण ट्रम्प आता २०२० च्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. आधीच्या प्रचार सभांत उत्तर कोरियावर खूप चर्चा होत असे, परंतु नंतर या मुद्द्याला वारंवार बगल दिल्याचे स्पष्ट झाले होतेे.
 

बातम्या आणखी आहेत...