आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला वाटतं की निखिल द्विवेदी एक चित्रपट बनवतील आणि त्यात भन्साळी अभिनय करतील - सलमान खान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः सलमान खान आणि शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअरिंगच्या बातम्यांना आता पूर्णविराम लागताना दिसतोय. इंग्रजी वेबसाईटनुसार सलमानने या प्रकरणाची दखल घेत उपरोधिक टोला लावला आहे. काही दिवसांपूर्वी निखिल द्विवेदी म्हणाले होते की, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटासाठी दोघेही खान तयार आहेत, पण भन्साळी स्क्रिप्टमुळे खूश नाही. निखिल म्हणाले होते की, चित्रपटाच्या कथेबद्दल बरीच संशयाची स्थिती आहे.


इंग्रजी वेबसाइट कोइमोईच्या वृत्तानुसार, 'दबंग 3'च्या सक्सेस पार्टी दरम्यान सलमानने निखिल द्विवेदी यांच्या वक्तव्याचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. तो म्हणाला, मला वाटतं की निखिल आणि भन्साळी  एकत्र चित्रपट करणार आहेत. ज्याचे दिग्दर्शन निखिल करणार असून भन्साळी हे अभिनय करणार आहेत. 


सलमान सध्या 'दबंग 3' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 20 डिसेंबर रोजी त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो चांगलाच गाजत आहे. फिल्म ट्रेड एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, देशभरात सीएएला सुरू असलेल्या विरोधामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सलमान खान आणि कीचा सुदीप स्टारर 'दबंग 3' ने तीन दिवसांत 81.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी 24.50 कोटी आणि दुसर्‍या दिवशी 24.75 कोटी कमावल्यानंतर या चित्रपटाने तिसर्‍या दिवशी 31.90 कोटींचा व्यवसाय केला. तथापि, देशभरातील नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) आणि एनआरसीच्या विरोधामुळे या चित्रपटाचे नुकसान झाले आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्शच्या ट्विटनुसार, आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला जवळपास 12 कोटींचा तोटा झाला आहे.