आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...' उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथ घेणार अाहेत. ठाकरे यांच्याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येक दाेन नेत्यांना राज्यपाल मंत्रिपदाची शपथ देतील.

या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असेल, ते पद राष्ट्रवादीकडे असेल. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास अाघाडीच्या बुधवारी रात्री बैठकीनंतर दिली.

महाराष्ट्र विकास अाघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची मंगळवारी निवड करण्यात अाली हाेती. बुधवारी सकाळी ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपालांना शपथविधी साेहळ्याचे निमंत्रण दिले. ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिलेली अाहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हाेईल. काेणत्या पक्षास किती मंत्रिपदे याविषयी अाघाडीच्या बैठकीत सुमारे तीन तास खल झाला. संभाव्य मंत्र्यांची नावे मात्र जाहीर करण्यास अाघाडीच्या नेत्यांनी नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी १५ तर काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळणार आहेत. 

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा; विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे : प्रफुल्ल पटेल

अजित पवार यांची सत्तेतून माघार; जयंत पाटील हाेणार उपमुख्यमंत्री... 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंड थंड झाल्यानंतर पुन्हा पक्षात परतलेल्या अजित पवारांनाच या पदावर नियुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही अामदारांनी शरद पवार यांच्याकडे केली हाेती. तेही अनुकूल हाेते, मात्र स्वत: अजितदादांनीच तूर्त मंत्रिपद घेण्यास नकार दिल्याची माहिती अाहे.

संभाव्य खातेवाटप


उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री
जयंत पाटील - उपमुख्यमंत्री/अर्थ
एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम
रवींद्र वायकर - नगरविकास
सुभाष देसाई - उद्योग
अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक
उदय सामंत - गृहनिर्माण
जितेंद्र आव्हाड - वैद्यकीय शिक्षण
नवाब मलिक - कामगार
धनंजय मुंडे - कृषी
बाळासाहेब थोरात - महसूल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष

कुणाला किती पदे.... 
 
15 - शिवसेना
15 - राष्ट्रवादी
13 - काँग्रेस

सोनिया, मोदी यांना निमंत्रण

आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना शपथविधीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरेंनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंधू राज ठाकरेंनाही निमंत्रण दिले. मोदींनी उद्धव यांचे अभिनंदन केले. राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, विविध देशांच्या राजदूतांसह देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिले आहे.