आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारनेर- आईने माझ्यावर जे संस्कार केले, त्यामुळेच मी समाजासाठी काही करू शकलो. आई ही जीवनातील पहिली गुरू असते. जीवनातील आईचे स्थान खूप मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
हजारे यांच्या मातु:श्री लक्ष्मीबाईंच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त नवलभाऊ फिरोदिया सभागृहात आयोजित काव्यांजलीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सहायक आयुक्त डॉ. गणेश पोटे, उपसभापती दीपक पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, गणेश शेळके, शंकर नगरे, राहुल शिंदे, दिनेश औटी, तहसीलदार गणेश मरकड, सुरेश पठारे, दादा पठारे, सरपंच प्रभावती पठारे, उपसरपंच लाभेश औटी, विलास पोटे, सुनील हजारे, माजी प्राचार्य ठकाराम राऊत, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पठारे, डॉ. धनंजय पोटे, जालिंदर मापारी, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, पर्यवेक्षक दिलीप देशमुख, प्रदीप मुनोत, गंगाभाऊ मापारी आदी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, प्रत्येकाचे जीवन घडवण्यात आईचा वाटा मोठा असतो. आईच मुलाचे दुःख समजू शकते. ज्या-ज्या वेळी मी आंदोलने, उपोषणे केली, त्या-त्या वेळी आई माझी किती काळजी घेत असे याच्याही आठवणी हजारे यांनी सांगितल्या. कवी असलेले तहसीलदार मरकड, भरत दौंडकर, अनंत राऊत, नारायण पुरी, अंकुश आरेकर यांनी कविता सादर करून उपस्थितांची मोठी दाद मिळवली, अरुण पवार यांनी "वायली ऱ्हायली मुलं, दोघांची वाटणी, माय परसात, बाप गोठ्याचा धनी" ही कविता सादर करून आई-वडील व मुलाचं नातं संपत चाललंय याचं वास्तव मांडलं. सुमित गुणवंत यांनी आई व वडिलांचं आयुष्यातील महत्त्व सांगणारी कविता सादर केली. हजारे यांनी प्रत्येक कवितेला दाद दिली. सुरेश पठारे यांनी आभार मानले. शरद मापारी यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.