आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत असताना काँग्रेसच्या माणिकराव गावितांना मतदान केले- विजय चौधरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांची माणुसकी पाहून मी शिवसेनेत असताना लोकसभेच्या निवडणुकीत माणिकरावांना मतदान केले. असे वक्तव्य नंदुरबार जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी भरत माणिकराव गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटना प्रसंगी केले. या कार्यक्रमात सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
 
विजय चौधरी म्हणाले, माणिकराव गावित मंत्री असताना कामासाठी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यांनी मी विरोधी पक्षात असताना देखील अतिथी देवोभव संस्कृती प्रमाणे आदरतिथ्य केले, त्यामुळेच हा निर्णय घेतला. नवापूर विधानसभा मतदार संघात भाजपाला मोठे करण्याचे काम भरत गावित यांच्यासह भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांकडे आहे. गावित यांचादेखील पक्ष योग्य सन्मान करेल. आधी राष्ट्र नंतर पक्ष अशी शिकवण भाजपाची आहे.नंदुरबार जिल्हा काँग्रेस मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. शुत्र पक्षाला कमजोर समजू नये. नवा, जुना भेदभाव न करता एकत्रित काम करत भाजप वाढवावा. तसेच जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी नोंदणी करावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले होते.

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ता नोंदणी अभियान घेण्यात आले. काँग्रेस पक्षाचे केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी नुकताच महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे जाहिर प्रवेश केला. काँग्रेस पक्षात अन्याय झाल्याने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते जनतेचे प्रश्न सोडण्यात अपयशी ठरले आहेत. भाजपाच्या कार्यकाळात तळागाळातील लोकांना न्याय दिला जाईल. नवापूर विधानसभा मतदार संघाचा विकास केला जाईल. काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे काम केले, पक्ष मोठा केला, मतदार संघाचा विकास केला. तरीदेखील आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे पक्षातंर केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम केले जाईल असे मत भरत गावित यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...