आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • I Was Sitting With Lata Didi And I Was Getting Messages That She Was Not In The World: Usha Mangeshkar

मी लता दीदींसोबत बसले होते आणि मला मेसेज येत होते की त्या या जगात नाही : उषा मंगेशकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः गानकोकिळा लता मंगेशकर रुग्णालयातून परत आल्या आहेत. न्यूमोनियामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत होता, बॉलिवूडचे मोठे दिग्गज त्यांना भेटायला येत होते. याच काळात अशीही एक वेळ आली जेव्हा लता दीदींच्या निधनाबद्दल अफवा पसरल्या. या कठीण काळात कुटुंबाने अशा अफवांपासून स्वत: ला दूर ठेवले. त्यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर यांनी प्रथमच त्या कठीण काळाबद्दल सांगितले.  मला लतादीदींच्या आजाराच्या वेळीचे सत्य सांगायचे आहे. सत्य हे होते की, दीदी पहिल्या पाच दिवसांत खूप आजारी होत्या. पण नंतर फास्ट रिकवर होऊन घरी परतल्या. परंतु या कालावधीत, त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवा आमच्यासाठी अतिशय धक्कादायक होत्या. त्यांचे निधन झाले, असे फॉरवर्ड मेसेजेस आणि कॉल मला येत होते. मी लता दीदींसोबत होते आणि त्या ब-या होत्या. काल्पनिक जगाचे सत्य बघा, लोकांना त्यांच्या बहिणीपेक्षा अफवांवर अधिक विश्वास होता. मी हसत हसत बोलत आहे, हे मला त्यांना पटवून द्यायचे होते. याचा अर्थ लता दीदी ठीक आहेत, हे मला त्यांना सांगायचे होते. माझ्यावर विश्वास ठेवा. विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणे किती सोपे आहे. हे खूप धोकादायक आहे.

  • त्यांना काय झाले होते?

लता दीदींना खरंतर न्यूमोनिया झाला होता. डॉ प्रितीक, डॉ राजीव शर्मा आणि डॉ जनार्दन दिवस-रात्र त्यांच्याबरोबर होते. त्यांनी दीदींवर उपचार केले आणि त्यांच्या कष्टाला फळ आले. दीदी अगदी ब-या झाल्या. आता त्या प्रत्येकाशी बोलतात. जेवण करतात. अगदी पूर्वीसारखेच झाले आहे. लोक लवकरच त्यांना ऐकू शकतील.

  • आता कशा आहेत दीदी?

दीदी घरी परतल्या असून पुढील आठ ते दहा दिवसांत गाणे सुरू करतील. आजारी पडल्यानंतरही त्यांच्या आवाजात फरक पडलेला नाही. दीदी आजारी होत्या तेव्हा आम्ही सगळी कामे सोडून त्यांच्याबरोबर बसून राहायचो. त्यांना आम्ही बहीण कमी आणि आई अधिक मानतो. काळजी घेण्यास पूर्ण महिना लागला.

  • अजूनही गोड आहेत सूर?

आजारी पडण्यापूर्वी लता दीदी एक गाणे म्हणत होत्या. त्यांच्याकडे फक्त दोन ओळी शिल्लक राहिल्या आणि त्याचवेळी त्यांची प्रकृती खालावली. आता त्या पूर्णपणे स्वस्थ आहेत आणि लवकरच सर्वांना त्यांचे गाणे पुन्हा ऐकायला मिळेल. सर्वात आनंददायक बाब म्हणजे रुग्णालयात इतके दिवस घालवल्यानंतरही त्याचा आवाज अजिबात बदललेला नाही. जेव्हा त्या हॉस्पिटलमधून घरी आल्या, तेव्हादेखील त्यांचा आवाज 20 वर्षापूर्वी सारखाच होता.

  • तीन बहिणींमध्ये काय कॉमन आहे?

जेव्हा आम्ही तिघी एकत्र असतो तेव्हा कधीही संगीताविषयी बोलत नाही. हसतो, विनोद करतो आणि एकत्र जेवण करतो. आम्ही तिघीही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये गातो. कोणीही एकमेकींना कॉपी करत नाही. आशा दीदींना कॉपी करणे खूप कठीण आहे. लता दीदींची कॉपी करणे कोणालाही शक्य नाही. त्यांचा आवाज देवाची देणगी आहे.

  • विष दिले गेले होते?

खूप वर्षांपूर्वी एक बातमी आली होती की, लता दीदींच्या जेवणात विषसारखे काहीतरी मिळाले होते. परंतु अद्याप याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित त्यांना फूड पॉयजनिंग झाले असावे. कदाचित तो गॅस्ट्रोदेखील असू शकतो. परंतु लतादीदींना त्याकाळात खूप त्रास सहन करावा लागला होता.

(मुकेश महतोंनी उषा मंगशेकर यांच्यासोबत उदयपूर येथे चर्चा केली.)

बातम्या आणखी आहेत...