आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- 'राममंदिरासाठी शिवसेनेचा प्रयत्न चालू आहे ही चांगली बाब आहे. मात्र कायदा करून किंवा अध्यादेश काढून मंदिर होत नसते. हा मुद्दा सामोपचारानेच सोडवावा लागेल. त्यासाठी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल,' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला त्याचप्रमाणे मलाही तिथल्या काही व्यक्तींकडून अयोध्येला येण्याचे निमंत्रण मिळाले आहे. मीदेखील लवकरच अयोध्येला जाईन, असेही आठवले यांनी सांगितले. रविवारी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, राष्ट्रीय सचिव एम. डी. शेवाळे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी या वेळी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राममंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली. तेथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र राममंदिराचा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी तेथे एखादी संस्था उभारावी; जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत. राममंदिर प्रश्नावर अयोध्येतील हिंदू-मुस्लिमांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. राममंदिराला आमचा विरोध नाही. पण बेकायदेशीररीत्या ते उभारण्याचा प्रयत्न कोणी करू नये.न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधू इच्छिणाऱ्यांनी शांत राहावे.'
'कोरेगाव भीमा' दंगलीचा एल्गार परिषदेशी संबंध नाहीच
'१ जानेवारी राेजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीशी आदल्या दिवशी शनिवारवाड्यावर झालेल्या 'एल्गार परिषदे'चा संबंध नसल्याचे मी वारंवार सांगतो आहे. शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंविरोधात पुरावा नसल्याचे पोलिस सांगतात, पण त्यांनी कसून तपास करायला हवा.
कोरेगावची दंगल पूर्वनियोजितच होती. पोलिस तपासात म्हणताहेत की संभाजी भिडेंविरुद्ध पुरावा नाही. त्यामुळे त्याचा पुन्हा कसून तपास व्हायला हवा. कोरेगाव भीमाची दंगल पूर्वनियोजित होती. चाैकशी आयोगामार्फत लवकरच माहिती पुढे येईल. या वेळचा कोरेगाव भीमाचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देऊ,' असे अाठवले म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.