आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा - माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडवण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिला.
मंत्री बच्चू कडू सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले की, अनेक शासकीय योजना आजही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. 50 वर्षांपूर्वी महिला व बालसंगोपन योजना अस्तित्वात आली. मात्र, 10 ते 20 हजार विधवा महिला असताना लाभार्थ्यांची संख्या मात्र, तीनशे, चारशे असणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही सातारा जिल्ह्यात नवीन योजना लागू केली आहे.
फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देणाऱ्या दोन शाळांवर कारवाई करण्याचे आदेश
दरम्यान यावेळी सातारा येथील के.एस.डी. शानभाग व जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे दोन्ही शाळांनी चाचणी परीक्षेस बसू दिले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान झाले होते. या संदर्भात आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले. त्या अनुषंगाने त्यांनी या दोन्ही शाळांवर तत्काळ कारवाई करुन त्याचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, आज राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री बच्चू कडू आढावा बैठकीच्या निमित्ताने सातार्यात आले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार उर्फ सागर भोगांवकर यांनी या दोन्ही शाळांसंदर्भात निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.