आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी भाजपला सोडून जाणार नाही, माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे, विखे पाटलांचे काँग्रेस प्रवेशावर स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राधाकृष्ट विखे पाटलांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती

अहमदनगर- पक्षविरोधी काम केल्याचा आरोप झेलत असलेले आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील परत काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, या सर्व चर्चानां स्वतः विखे पाटलांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याविरोधात बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत भाजपला सोडून कुठेही जाणार नसल्याचे विखे पाटलांनी स्पष्ट केले.मागील काही दिवसांपासून विखे पिता-पुत्रावर विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याचा आरोप होत आहे. त्यावर विखेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. विखे म्हणाले, "माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. माझी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंची भेट झाली नाही. काँग्रेस पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. जे षडयंत्र रचत आहेत त्याच्या मुळाशी जाण्यासाठी खोट्या बातम्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे. मी काँग्रेस पक्षात परतणार या बातम्या निराधार आहेत, अशा अफवा पसरवून कोणीतरी मला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे." पक्षाची एक शिस्त आहे. त्यामुळे पक्षाची अंतर्गत भांडणं चार चौकटीतच मांडायला हवीत. मी पक्षाकडे माझी भूमिका मांडली आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे मत विखेंनी व्यक्त केले. ते राम शिंदेंच्या आरोपावर बोलत होते.27 डिसेंबरला राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यामुळे विखे आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर प्रश्न विचारला असता व्यक्तीगत संबध ठेवू नये ही भुमिका दुर्दैवी आहे. विघ्न संतोषी लोक अशा प्रकारे संभ्रम पसरवत असल्याचेही विखे म्हणाले. यावेळी विखेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "बाळासाहेब थोरात यांची किव येते. काँग्रस अपघाताने सत्तेत आले आहेत. उलट थोरात अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसचा फुटबॉलच झाला आहे."

बातम्या आणखी आहेत...