आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या निवृत्तीनंतर मीही राजकारण सोडेन : स्मृती इराणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मी राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी देणारे केवळ नरेंद्र मोदी होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मीदेखील राजकारण सोडेन, अशी भावना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात आयोजित ‘वर्ड््स काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. यात ‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी – फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’ या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली. 


यंदाही अमेठीमधून निवडणूक लढवणार का, या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, २०१४ मध्ये स्मृती कोण? हा प्रश्न अनेकांनी केला. २०१९ मध्ये सर्वांना ते माहिती आहे. मी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील. तसेच माेदींनंतर काेण हे ठरविण्याचा अधिकार जनतेलाच असल्याचे त्या म्हणाल्या. 


आजच्या पिढीला सल्ले घेण्याची गरज नाही : आज देशाची युवा पिढी ही सक्षम आहे. त्यांना कोणाकडूनही सल्ले घेण्याची गरज नाही. ही स्मार्ट पिढीच देशाचे भविष्य असून त्यांची सकारात्मक ऊर्जा देशाला पुढे नेईल. तसेच स्त्रियांनीही आत्मविश्वासाच्या जोरावर आपले ध्येय साधण्यासाठी इतरांचा सल्ला आणि सहकार्याची अपेक्षा न करता वाटचाल करावी. भाजपने पुरुष कार्यकर्त्याप्रमाणेच महिला कार्यकर्त्यांना समान वागणूक दिली आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, एक महिला अध्यक्ष असलेल्या पक्षाने यासाठी काही केले नाही, ही देशाची व्यथा असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

 

बातम्या आणखी आहेत...