आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता अमृता फडणवीस म्हणाल्या- 'मी पुन्हा येईन..!' ट्विटरवर कविता सादर करत व्यक्त केल्या भावना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुसऱ्या कार्यकाळात केवळ 4 दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अल्पमतामुळे राजीनामा द्यावा लागला. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचे घोषवाक्य 'मी पुन्हा येईल' खूप गाजले. निकालानंतर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही अशी घोषणा त्यांनी पहिल्यांदा केली, तेव्हा त्यांना याच वाक्यावरून इंटरनेटवर ट्रोल करण्यात आले. 23 नोव्हेंबरला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा भाजप आणि फडणवीस समर्थकांनी 'मी पुन्हा आलो' या वाक्यासह देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले. आता 4 दिवसांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याच वाक्यावरून चक्क कविताच सादर केली.

बातम्या आणखी आहेत...