kargil war / करगिलला 20 वर्षे पूर्ण; परत कारगिल झाल्यास एअर फोर्स चोख उत्तर देणार- वायुसेना प्रमुख बीएस धनोआ


कारगिलनंतर एअर फोर्सची क्षमता वाढवण्यात आली, आता कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद
 

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 07:37:00 PM IST

नवी दिल्ली- वायुसेना प्रमुख बीएस धनोआ म्हणाले, एअर फोर्स कोणत्याही युद्धासाठी तयार आहे. कारगिल प्रमाणे युद्ध, दहशदवादी हल्ले किंवा युद्धस्थिती निर्माण झाली तरी एअर फोर्स त्यासाठी तयार असेल.


धनोआ यांनी ऑपरेशन "सफेद सागर"ला 20 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कारगिलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याच्या काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले- "मिग-21 विमानातून जमीनीवर बॉम्ब फेकण्याची ती पहिलीच वेळ होती. करगिलमधून घुसखोरांना पळवून लावण्यासाठी 1999 मध्ये वायुसेनेने ऑपरेशन "विजय"च्या अंतर्गत ऑपरेशन "सफेद सागर" राबवले होते." धनोआ तेव्हा 17 स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते.


'कोणत्याही धोक्याचा सामना करू शकतोत'
धनोआ पुढे म्हणाले की, कारगिल युद्धानंतर एअर फोर्सच्या क्षमतेत भरपूर प्रमाणात वाढ झाली. यामुळे आता आम्ही हवेतच कोणत्याही धोक्याचा सामना करू शकतोत. कारगिलच्या वेळेस बॉम्ब फेकण्याची जी क्षमता मिराज-2000 मध्ये होती, आज ती क्षमता सुखोई-30, जगुआर, मिग-29 आणि मिग-27 अपग्रेडेडमध्येही आहे. यावर्षी 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअरफोर्सने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइ केली होती.

पुढे म्हणाले- आज आम्ही सुखोई-30, मिग-29 आणि मिराज 2000 मधून बीवीआर (बियॉन्ड विजुअल रेंज) मिसाइलला नेण्याची क्षमता आहे. वायुसेनेजवळ अवाक्स आहे, जे क्षत्रु देशांतील भागातील एअरस्पेसला मॉनिटर करू शकतो.

X
COMMENT