आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील 'मानवाधिकारांच्या उल्लंघना'मुळे IAS ने दिला राजीनामा, म्हणाले - येथे मी स्वतःचा आवाज गमावून बसलो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपूरम - केरळ कॉडरचे IAS कन्नन गोपीनाथन यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सुरु असलेले ब्लॅकआउट आणि मानवी अधिकारांचे होत असलेले उल्लंघनामुळे राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. मळयाली वेबसाइट ieMalayalam.comला दिलेल्या मुलाखतीत गोपीनाथन यांनी आपल्या राजीनाम्याविषयी सविस्तर सांगतिले.  
 
दरम्यान कन्नन यांच्या राजीनाम्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर लोकांमध्ये काश्मीर मुद्द्यावर वाद-विवाद होत आहे. 
 

काय म्हणाले कन्नन गोपीनाथन? 
ते मुलाखतीत बोलताना म्हणाले की, जेव्हा कोणी विचारणार केली की जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाने एका संपूर्ण राज्यावर बंदी घातली, तेथील लोकांचे मानवी अधिकार काढून घेतले तेव्हा तुम्ही काय करत होते. तेव्हा मी त्याच्या विरोधात होतो म्हणून नोकरीचा राजीनामा दिला असे मी सांगू शकेन. 
 

स्वतःचा आवाज गमावून बसलो आहे
माझ्या राजीनाम्याने काही फरक पडेल असे मला वाटत नाही. पण जेव्हा देश कठीण परिस्थिती होता तेव्हा तुम्ही काय केले असे कोणी विचारले तर मी सुट्टी घेतली आणि शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो असे सांगता येईल. अशा परिस्थिती नोकरी सोडने मला योग्य वाटले. मी लोकांच्या अडचणी समोर मांडता येतील यासाठी मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलो होते. पण येथे तर मी स्वतःचा आवाज गमावून बसलो आहे. गोपीनाथन पुढे म्हणाल की, मी नोकरीचा राजीनामा का देत आहे हा प्रश्न नाहीये. पण मी यावेळी नोकरीत का रहावे असा प्रश्न विचारला पाहिजे. 
 

मागील काही दिवसांत चर्चेत आले होते कन्नन
कन्नन मागील दिवसांत डीएनएच प्रशासनाच्या जिल्हाधिकारीपदी कार्यकरत होते. दरम्यान पूरग्रस्त भागातील नागिरकांची मदत केल्यामुळे ते चर्चेत आले होते. ते मदत आणि बचाव कार्य करताना दिसून आले होते. त्यांनी प्रशासनाकडून केरळ मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांचा चेक सुद्धा दिला होता. 
 
 

विविध पदांवर कन्नन यांनी केले काम
कन्नन यांनी बिर्ला इन्स्टीट्यू ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.टेकची पदवी घेतली आहे. 2012 मध्ये सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत 59 वा क्रमांक पटकावला होता. कन्नन यांनी केरळमध्ये अनेक महत्तावाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे सचिवपद देखील भूषवले आहे. तसेच कन्ननच्या जिल्हाधिकारीपदाचा त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...