आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IAS Officer Beats Up Person Inside Police Station In West Bengal Video Goes Viral

IAS ऑफीसरने पोलिस ठाण्यात पत्नीसमोर एका व्यक्तीला केली जबर मारहाण, तो दयेची भीक मागत होता, पाय पकडले, माफी मागत राहीला, पण कलेक्टरने मारणे बंद केले नाही...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीपूर(पश्चिम बंगाल)- पश्चिम बंगालमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येथील एका कलेक्टरने एका व्यक्तीला पोलिस ठाण्यात वाईट पद्धतीने मारहाण केली आहे, आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. प.बंगालच्या अलीपूर जिल्ह्याचे कलेक्टर निखिल निर्मलची पत्नीच्या फेसबूक पेजवर एका व्यक्तीने आपत्तीजनक कमेंट केली, त्यामुले त्या व्यक्तीला ठाण्यात बोलवण्यात आले.


तो व्यक्ती ठाण्यात आला तेव्हा तेथे कलेक्टर निखील आणि त्यांची पत्नी आधीच उपस्थीत होती. कलेक्टरने पोलिस आणि पत्नीसमोर त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. कलेक्टर इतक्या जोशात आले होते की, त्यांनी त्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीही दिली. व्यक्ती आपल्या चुकीची माफी मागत होता, पाय पकडत होता पण कलेक्टरने काहीच ऐकले नाही आणि त्याला मारहाण करतच राहिले. 


हा सगळा प्रकार पोलिसांसमोर घडत होता, पण ते काहीच करत नव्हते. काही वेळानंतर कलेक्टरच्या पत्नीने एक काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांनी अडवले. कोणतरी हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल केला, त्यानंतर कलेक्टरला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...