आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढे यांची एका महिन्यात मंत्रालयातूनही उचलबांगडी, आता सोपविली \'या\' विभागाची जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या एका महिन्यात मंत्रालयातून उचलबांगडी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्तपदावरून मुंडे यांची 21 नोव्हेंबरला मंत्रालयात नियोजन आयोगाच्या सहसचिवपदी बदली करण्‍यात आली होती. या पदाचा कार्यभार ते स्विकारत नाही तोच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता मुंडे यांची एड्‍स नियंत्रण प्रकल्प संचालकपदी बदली करण्‍यात आली आहे.

 

बहुचर्चित तुकाराम मुंढे, शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने गुरुवारी बदल्या केल्या. महिनाभरापूर्वीच नाशिकहून बदली झालेल्या मुंढेंना आता एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी दिली आहे, तर अग्रवाल यांना पुणे मनपात अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले. या पदावरील शीतल तेल्ही-उगे यांची नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली. बालाजी मंजुळे यांची आंध्र प्रदेशातून पुण्यात बदली करण्यात आली. ते अपंग कल्याण आयुक्त म्हणून काम पाहतील.

 

बातम्या आणखी आहेत...