Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | IAS Shiv Prasad Nakate success Story on National Youth Day

जिल्हा परिषद शाळेत शिकले, गावात कोचींग नव्हती म्हणून सेल्फ स्टडी केली, 3 नोकऱ्यात सलेक्शन झाले पण जिद्द होती IAS बनण्याची, पहिल्याच प्रयत्नात बनले IAS...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:02 AM IST

IAS बनण्यात वडिलांच्या सल्ल्याचा मोलाचा वाटा.

 • IAS Shiv Prasad Nakate success Story on National Youth Day

  सोलापूर(महाराष्ट्र)- युवा दिवसाचे औचित्य साधून जाणून घ्या 25 व्या वर्षी कलेक्टर बनलेले शिवप्रसाद मदन नकाते यांच्या यशाची गोष्ट. महाराष्ट्रातील सोलापूरमधील माडा गावात सामान्य शेतकरी परिवारात त्यांचा जन्म झाला. वडील मदन नकाते एक सामान्य शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. लहान असताना वडिलांना लोकांच्या समस्येसाठी सरकारी कार्यालयात जाताना पाहिले, अनेक वेळेस त्यांच्यासोबत देखील गेले आणि आधिकारी होऊन लोकांसाठी काही करण्याचे ठरवले. मग माडा गावातील जिल्हा परिषद शाळेत 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले, त्या दरम्यान यूपीएससीची सिविल सर्विसेज एग्झाम क्लीअर करून आयएएस बनण्याचे स्वप्न पाहिले.


  वडिलांच्या सल्याने मिळाली मदत
  शिक्षणादरम्यान एकदा बीडीएस आणि दूसऱ्यावेळेस एमटेक करण्यासाठी आयआयटीची एंट्रेस टेस्ट पास केली. मुलगा डॉक्टर व्हावा अशी पालकांची इच्छा होती. पण आयएएस बनायचे होते त्यामुळे बीडीएस किंवा आयआयटीमध्ये अॅडमिशन घेतले नाही. ग्रामीण भाग असल्यामुळे कोचींगदेखीन नाही लावली. आत्मविश्वासासोबत सेल्फ स्टडी केली, आणि त्या दरम्यान फोनपासून लांब राहिलो. शाळेत असताना वडिलांनी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली होती त्याचा खुप फायदा झाला.


  पहिल्याच प्रयत्नात बनले IAS
  वृत्तपत्रांशिवाय त्यांनी 10 तास रोज सिलॅबसच्या अभ्यास करायचे. 2010 मध्ये महाराष्ट्र प्रशासनिक सेवा, राज्य वन सेवा आणि सेंट्रल पोलिस फोर्समध्ये त्यांचे सलेक्शन झाले पण आयएएस बनण्याचे स्वप्न होते त्यामुळे या तिन्ही नोकऱ्यांना नकार दिला. त्यानंतर सेल्फ स्टडी करून 2010 मध्ये यपीएससी ची परिक्षी दिली आणि 2011 मध्ये त्याचा निकाल लागला आणि पहिल्याच प्रत्नात पास झाले.


  युवकांसाठी संदेश
  चांगले काम करण्याच्या संधी प्रत्येक ठिकाणी असतात. कोणतेही क्षेत्रा असो चांगल्या भावनेने काम केल्यास यश तुम्हाला नक्कीच मिळते
  - शिवप्रसाद मदन नकाते, कलेक्टर आणि जिल्हा मजिस्ट्रेट, श्रीगंगानगर.

Trending