आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IBPS Clerk Result 2018 On Ibps In,ibps Clerk Prelims Result May Declare Today, Ibps Clerk News Update

IBPS Clerk Pre Exam 2019 Result: कोणत्याही क्षणी जाहीर होतील परीक्षेचे निकाल, असा चेक करा रिझल्ट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

IBPS Clerk Pre Exam Result: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)च्या प्री एक्झामचे निकाल आता कोणत्याही क्षणी जारी होऊ शकतात. गतवर्षीचा विचार केल्यास निकाल 29 डिसेंबर रोजी जारी करण्यात आले होते, यामुळेच आता या वर्षीही ठीक त्याच पद्धतीने निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. यावर्षी IBPS ने 7,275 क्लर्क पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. अंदाजाप्रमाणे मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले होते. 18 सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती, यानंतर याच महिन्यात डिसेंबरमध्ये चार दिवसांपर्यंत परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुसरीकडे आता परीक्षार्थींच्या निकालाची प्रतीक्षा आहे, जो कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. यामुळेच रिझल्ट कसा चेक करू शकता, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

असा चेक करा रिझल्ट
- सर्वात आधी IBPS च्या ऑफिशियल वेबसाइट ibps.in वर जा.
- होमपेजवर जाऊन Clerk prelims results च्या लिंकवर क्लिक करा.
- दुसऱ्या पेजवर पुन्हा एकदा रिझल्ट लिंकवरच क्लिक करा.
- मागितलेली माहिती भरून सबमिट करा आणि रिझल्ट पाहा.


20 जानेवारी रोजी होईल मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यातील यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेत सहभागी होता येईल. ही परीक्षा 20 जानेवारी 2019 रोजी होणार आहे. गतवर्षी मुख्य परीक्षा 21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...