आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा मोठा विजय, ICC ने 500 कोटी दंड घेण्याच्या पीसीबीच्या अर्जाला फेटाळले, जाणुन घ्या काय आहे पुर्ण प्रकरण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - बीसीसीआयने दुहेरी मालिका रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे 500 कोटींच्या भरपाईची याचिका केली होती. पण पाकिस्तानला याबाबत झटका बसला आहे. कारण आयसीसीच्या विशेष समितीने हा दावा करणाची पाकिस्तानची याचिका  फेटाळून लावली आहे. आयसीसीमधील सुनावणीनंतर ही याचिका फेटाळून लावण्यात आली. आता बीसीसीआयच या प्रकरणी झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी पीसीबी विरोधात याचिका दाखल करणार आहे.

 

निर्णयाच्या विरोधात दाद मगू शकत नाही 
आयसीसीच्या समितीने म्हटले आहे की, त्यांनी दिलेला हा निर्णय अंतिम असेल. त्याच्या विरोधात आता पाकिस्तानला कुठेही अपील करता येणार नाही. आयसीसीचा निर्णय आल्यानंतर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले की, या निर्णयाने आमची बाजू खरी ठरली. पीसीबीने एका प्रस्तावाला करार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. आता बीसीसीआय आयसीसीच्या समोर, या प्रकरणात खर्च झालेली रक्क्म वसूल करण्यासाठी पीसीबी विरूद्ध नुकसान भरपाईची मागणी करणार आहे."   


चार वर्षांपूर्वीचे प्रकरण 
बीसीसीआयने 2014 मध्ये पीसीबीच्या एका प्रस्तवावर सहमती दर्शवली होती. त्यानुसार 2015 ते 2023 पर्यंत भारत-पाकिस्तानच्या टीममध्ये 6 मालिका होणार होत्या. पण भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे या मालिका झाल्याच नाही. त्यामुळे पाकिस्तानने 500 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...