• ICC Ranking : Bumrah two years later ranked second from number one

आयसीसी क्रमवारी / बुमराह दोन वर्षांनी नंबर वनवरून दुसऱ्या स्थानावर, कोहलीला १७ गुणांचे नुकसान, अव्वलस्थान कायम

बुमराह न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत एकही बळी घेऊ शकला नाही; ४५ गुणांचे नुकसान
 

वृत्तसंस्था

Feb 13,2020 09:00:00 AM IST

दुबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. फेब्रुवारी २०१८ नंतर पहिल्यांदा बुमराह क्रमवारीत अव्वल स्थानावरून बाजूला झाला. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत बुमराह बळी घेऊ शकला नाही. त्याचे ४५ गुणांचे नुकसान झाले. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट नंबर वन गोलंदाज बनला. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत केवळ एक अर्धशतक करणारा कर्णधार विराट कोहलीला १७ गुणांचे नुकसान झाले. मात्र, तो अव्वलस्थानी कायम अाहे. सलामीवीर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी कायम आहे.


कोहलीचे जुलै २०१७ नंतर सर्वात कमी रेटिंग गुण : कोहली ८६९ रेटिंग गुणांसह नंबर वन आहे. जुलै २०१७ नंतर त्याचे सर्वात कमी रेटिंग गुण झाले. तेव्हा कोहलीचे ८५६ गुण होते. रोहित दुखापतीमुळे मालिकेत खेळू शकला नाही. त्यालादेखील १३ गुणांचे नुकसान सोसावे लागले. रवींद्र जडेजाने अष्टपैलूच्या क्रमवारीत तीन स्थानांनी उसळी घेतली. आता तो क्रमवारीत सातव्या क्रमांकावर पोहोचला. गोलंदाजीत लेगस्पिनर यजुवेंद्र चहल तेराव्या आणि डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव १६ व्या स्थानावर आला.


अव्वल-५ फलंदाज


खेळाडू देश गुण


कोहली भारत 869


रोहित भारत 855


बाबर पाक 829


रॉस टेलर न्यूझीलंड 828


प्लेसिस द. आफ्रिका 803


अव्वल-५ गोलंदाज


खेळाडू देश गुण


ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड 727


बुमराह भारत 719


मुजीब अफगान 701


रबाडा द. अाफ्रिका 674


पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया 673

X
COMMENT