ICC World Cup / ICC World Cup 2019 : वर्ल्डकप 2019 साठीचे अधिकृत गाणे रिलीज, लोरिन आणि ब्रिटनच्या रूडिमेंटल बँडने केली गाण्याची निर्मिती

हे गाणे युनायटेड किंग्डमच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवते -  आयसीसी
 

दिव्य मराठी वेब टीम

May 18,2019 02:51:26 PM IST

स्पोर्ट डेस्क - आयसीसीने 12 व्या एकदिवसीय विश्वकपासाठीचे अधिकृत एक गाणे रिलीज केले आहे. 'स्टँड बाय' असे या गाण्याचे नाव आहे. नवीन गायिका लोरिन आणि ब्रिटनच्या रुडिमेंटर बँड यांनी या गाण्याची निर्मिती केली. 30 मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेदरम्यान मैदानावर आणि शहरातील विश्वचषकाशी निगडीत कार्यक्रमांत हे गाणे वाजवण्यात येणार आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार पहिली लढत

> आयसीसीनच्या मते, 'स्टँड बाय गाणे युनायटेड किंग्डमच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवते.' या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केनिंग्टन ओव्हल लंडन येथे होणार आहे.


> रॉबिन फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. एक संघाला एकूण सामने खेळावे लागणार आहे. लीग राउंडमधील 4 संघ उपांत्य सामन्यात खेळतील. विश्वकप स्पर्धेचा अंतिम सामना 14 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे.


भारताने 2011 मध्ये विश्वकपावर कोरले होते नाव
इंग्लंडच्या 11 मैदानांवर 46 दिवसांत 48 सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वकपावर भारताची नजर आहे. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये विश्वकपावर आपले नाव कोरले होते.

X
COMMENT