आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन फलंदाज म्हणून कायम आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा पुन्हा एकदा कसोटी गोलंदाजीत नंबर वन बनला आहे. विराटचे ९३५ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान विराटच्या अव्वल पदाला कोणताही धोका नाही. दुसऱ्या स्थानावर असलेला स्टीव्ह स्मिथ (९१० गुण) या मालिकेत बंदीमुळे खेळणार नसल्याने त्याचे गुण कमी होणे निश्चित आहे.
गोलंदाजीत रबाडाने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची जागा घेतली. अँडरसन श्रीलंकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत एक विकेट घेऊ शकला. तिसऱ्या सामन्यात तो खेळला नाही. अँडरसनला ९ गुणांचे नुकसान झाले. तो आता रबाडापेक्षा अाठ गुणांनी मागे पडला. भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनदेखील एका स्थानाने प्रगती करत सातव्या स्थानी पोहोचला. रवींद्र जडेजा आता पाचव्या स्थानी आहे. दुसरीकडे जडेजा भारताचा नंबर वन गोलंदाज ठरला. आश्विनला आठव्या स्थानावरील वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला दोन स्थानांचे नुकसान झाल्याने फायदा झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या एकमेव सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. हा सामना क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध आहे. सिडनी मैदानावर जोरदार पाऊस झाल्यानंतरही मैदान व खेळपट्टी व्यवस्थित राहिली. वातावरण निवळल्यानंतर पुन्हा खेळ सुरू होण्याची आशा होती. मात्र, दुसऱ्यांदा पाऊस झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला. त्यानंतर विराट कोहली, ईशांत शर्मा व मुरली विजयने व्यायामशाळेत जाऊन सराव केला. विराटने टि्वटरवर छायाचित्र पोस्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.