ICC World Cup / ICC world cup : आज भारत-पाकिस्तान सामना, विजय बरसणार की पाऊस... ? सामना रद्द झाल्यास....

पावसाची शक्यता 70%, विजयाची शक्यता 100%, कारण विश्वचषकात भारताने पाकला दरवेळी हरवले  

वृत्तसंस्था

Jun 16,2019 09:39:45 AM IST

मँचेस्टर - १२ व्या विश्वचषकातील सर्वात मोठा सामना रविवारी होणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. आजपर्यंतच्या विश्वचषकातील सर्व सामन्यांत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. यापूर्वी १९९९ च्या विश्वचषकातील सामन्यात भारताने पाकचा ४४ धावांनी पराभव केला होता. सामन्यावेळी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.


मँचेस्टरमध्ये पाकने प्रथम फलंदाजी केल्यास पाक पराभूत होतो : मँचेस्टरमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी केली आणि पराभव झाला. धावांचा पाठलाग करताना तीन सामने जिंकले, तर दोन गमावले. आकडेवारी पाहिल्यास पाकचा संघ प्रथम फलंदाजी करताना येथे कधीच विजयी ठरला नाही, तर भारताने येथे ८ सामने खेळले आहेत. प्रथम फलंदाजी करताना दोन जिंकले, ४ गमावले. धावांचा पाठलाग करताना एक जिंकला, एक गमावला आहे. विश्वचषकात भारताने ज्या सहा सामन्यांत पाकला पराभूत केले. त्यापैकी पाच वेळा प्रथम फलंदाजी केली आहे.

दोन्ही संघांचे रेकॉर्ड

> विश्वचषकात 6 सामने : भारत 6 जिंकले, पाकिस्तान 0
> वनडेत 131 सामने : भारत 54 जिंकले, पाकिस्तान 73 जिंकले, 4 निर्णय नाही
> मागील 10 सामने : भारत 6 जिंकले, पाकिस्तान 4 जिंकले

सामना रद्द झाल्यास १४० कोटींच्या नुकसानीची शक्यता

पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास प्रायोजकांना (स्टार स्पोर्ट््स) सुमारे १४० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पावसामुळे ४ सामने रद्द झाले आहेत. यापूर्वीच स्टारचे सुमारे १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सामन्यातील १० सेकंदांच्या जाहिरातीचे दर १.६ लाख ते १.८ लाख रुपयांपर्यंत आहेत, तर भारत - पाकिस्तानमध्ये तो वाढून २.५ लाखांपर्यंत पोहोचतो.

X
COMMENT