Icc world cup / World Cup 2019/ भारतीय संघाला धक्का, अष्टपैलू विजय शंकर दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर; या खेळाडूला मिळू शकते संधी

सरावादरम्यान बुमराहचा चेंडू विजच्या पायाच्या अंगठ्याला लागला
 

दिव्य मराठी वेब

Jul 01,2019 02:49:00 PM IST

लंडन - शिखर धवन, भुवनेश्वर कुमार पाठोपाठ आता भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यामुळे विश्वचषकातून बाहेरू पडला आहे. यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होण्याची भीती आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. मयंक आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.

सरावादरम्यान झाली होती दुखापत

सरावादरम्यान वेगवान गोलंदाज बुमराहचा चेंडू विजयच्या पायाच्या अंगठ्याला लागल्यामुळे दुखापत झाली होती. पण ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर विजयला अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात संघात सहभागी करून घेतले होते. पण त्याला रविवारी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

विजय भारतात परतणार
विजयच्या पायाची दुखापत गंभीर नाही. तो लवकरच संघात परत येऊ शकतो असे सांगितले होते. पण त्याच्या दुखाकपतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याला आता विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे तो भारतात परतणार आहे. अशी माहिती बीबीसायच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

2019 विश्वचषकासाठी निवड समितीने अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरवर विश्वास दाखवला होता.

X
COMMENT