आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलावंतांचे 8500 फूट उंचीवर उणे 12 तापमानात बर्फापासून तयार केलेली वाद्ये वाजवून सादरीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - इटलीतील  आल्प्स पर्वतावर थंडीच्या दिवसांत लोकांना राहणे कठीण होते. अशा थंडीतही एक बँड आपले उत्कृष्ट सादरीकरण करतो आहे. शनिवारी येथे आइस म्युझिक फेस्टिव्हल पार पडला. यात कलावंतांनी ८५०० फूट उंचीवर उणे १२ डिग्री तापमानात आपले उत्कृष्ट सादरीकरण पार पाडले. कलावंतांनी व्हायोलिन, ड्रमसेट, झायलोफोन व मेंडाेलिन यासारखी बर्फाची वाद्ये तयार केली होती. बँडचे सादरीकरण एका इग्लूमध्ये (लहान घरे) करण्यात आले. बँडचे सदस्य व अमेरिकेत राहणारे टिम लिनहार्ट यांनी सांगितले, उंचीवर दाब कमी असतो. यामुळे बर्फापासून तयार केलेली वाद्ये अनेकदा फाटतात. तथापि, त्यांच्या बँडने अशा प्रकारची वाद्ये वाजवणेही शिकून घेतले आहे. 


बर्फाच्या व्हायोलिनचा आवाज खूप स्पष्ट
टिम लिनहार्ट यांनी सांगितले, आल्प्स पर्वतावर गेल्या १६ वर्षांपासून आइस ऑर्केस्ट्रा चालवत आहोत. त्यांनी प्रथमच जेव्हा बर्फापासून तयार केलेले व्हायोलिन वाजवले तेव्हा त्याचा आवाज लाकडी व्हायोलिनपेक्षाही खूप स्पष्ट होता. 


लाकडी व्हायोलिनमध्ये आवाज खूप कमी एेकू येत होता. त्यामुळे या व्हायोलिनपासून चांगला आवाज ऐकू यावा म्हणून त्यास तारेने मजबूतपणे बांधले. यानंतर व्हायोलिन एका जोरदार आवाजाने फाटला. यामुळे माझी हिंमतच खचली. त्यानंतर बर्फाची वाद्ये केली व बँड सुरू केला.  

{टिम यांनी सांगितले, बर्फापासून तयार केलेली वाद्य यंत्रे खूप अवजड असतात. ती उचलणे शक्य नसते. यासाठी संगीतकार त्यांना जाड स्टीलच्या तारेने इग्लूच्या छताला बांधतात. संगीताचा कार्यक्रम संपल्यानंतर इग्लूच्या भिंती फोडून त्यांना तेथे गाडले जाते. आपण उन्हाळा पत्नी व मुलांसोबत स्वीडनमध्ये व्यतीत करताे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...