Home | International | China | Ice tourism in China

सरकारने 35 वर्षांपूर्वी बर्फास उत्पन्नाचे साधन बनवले, आता उणे 20 अंश तापमानात जमलेल्या सराेवरात स्विमिंग, स्केटिंग, हाफ मॅरेथाॅनचे आयाेजन 

वृत्तसंस्था | Update - Jan 13, 2019, 09:29 AM IST

तीन वर्षांपासून लियाओनिंगच्या शेनयांगमध्ये जमलेल्या सराेवरामध्ये पर्यटकांसाठी अर्ध मॅरेथाॅनसह उपक्रम राबवले जातात.

 • Ice tourism in China

  बीजिंग- हे चीनमधील लियाओनिंग प्रांतात शेनयांगची शिहू सराेवर आहे. दरवर्षी हिवाळ्यात पारा उणे २० अंशापर्यंत पाेहचत असल्यामुळे सराेवरातील पाण्याचे बर्फ हाेऊन जाते. जवळपास अडीच महिने अशीच परिस्थिती असते. साधारणता हिवाळ्यात तापमान कमी हाेत असल्याने वाहतूक ठप्प हाेते. त्यामुळे स्थानिकांना उत्पन्नही मिळत नाही. परंतु लियाओनिंग प्रांताने एक संधी म्हणून पाहिले. ८० च्या दशकात प्रशासन व स्थानिक नागरिकांनी जमलेल्या सराेवरावर पर्यटकांना आणण्याची याेजना तयार केली. जमलेल्या सराेवरातील बर्फ कापून १९८५ मध्ये आइस अण्ड स्नाे फेस्टिवल सुरु केले. या फेस्टीवलमध्ये बर्फच्या मूर्ती तयार केल्या जात हाेत्या. त्यानंतर चीनमधील अन्य भागांतही हा उपक्रम सुरू झाला. आता तीन वर्षांपासून लियाओनिंगच्या शेनयांगमध्ये जमलेल्या सराेवरामध्ये पर्यटकांसाठी अर्ध मॅरेथाॅनसह उपक्रम राबवले जातात. यावर्षी आणखी एक इव्हेंट जाेडला. यावर्षी सराेवरास स्केटींग सेंटर म्हणून विकसित केले. बर्फ कापून स्विमिंग क्लब बनवला गेला. यात पाेहचण्याचे आव्हान दिले .दरम्यान, लियाओनिंग व हीलोंगजियांगच्या हार्बिनमध्ये दरवर्षी माेठ्या संख्येने पर्यटक येतात. हार्बिनच्या आइस अॅण्ड स्नो फेस्टिवलसाठी २ काेटी पर्यटक येतात. लियाओनिंगमध्ये २० लाख पर्यटत येतात. दाेन्ही ठिकाणचे मिळून ३५ हजार काेटी उत्पन्न हाेते.

  जगात बर्फाचे अन्य फेस्टिव्हल द सुपोरो स्नो फेस्टिव्हल, जपान :
  जपानच्या सुसुकिनोच्या ओडोरी पार्कमध्ये प्रत्येक वर्षी फेब्रुवारीत एका आठवड्याचा आइस फेस्टिव्हल आयाेजित केला जातो. हिवाळ्यातील हा सर्वात माेठा उपक्रम असताे. ६१ वर्षांपासून त्याचे आयाेजन केले जाते.

  स्नोकिंग विंटर फेस्टिवल, कॅनडा:
  कॅनडाच्या यलोनाइफ ग्रेट स्लेव सराेवरावर १९९६ पासून स्नोकिंग विंटर फेस्टिवल आयाेजित केले जाते. त्यात बर्फापासून किल्ला, महाल, इमारती बनवल्या जातात.

  पेर्न इंटरनॅशनल स्नो अँड आइस स्कल्पचर फेस्टिवल,रशिया:
  रशियात हा महाेत्सव ४० वर्षांपासून आयाेजित केला जात आहे. यात बर्फापासून कलाकृती बनवण्याची स्पर्धा घेण्यात येते. गोर्की एम्यूजमेंट पार्कमध्ये हाेणाऱ्या या उपक्रमात २० देशांमधील कलाकार सहभागी हाेतात.

Trending