Home | International | Other Country | Iceberg wakeboarding in Patagonia

चिलीत हिमनदीचे फुटबॉल मैदानाएवढे तुकडे वाहताहेत...

दिव्य मराठी | Update - Mar 15, 2019, 03:30 PM IST

तरंगू लागले हिमखंड : चिलीच्या ग्रे ग्लेशियरमधून वाहत आलेले हिमखंड प्रवाहाबरोबर पुढे जात आहेत...

 • Iceberg wakeboarding in Patagonia

  सँटियागो : ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील हिमनद्यांवर परिणाम झाला आहे. चिलीच्या पॅटागोनियातील जलाशयाच्या बर्फाळ पात्राला भेगा पडल्या आहेत. ते वितळले. त्यातून दोन महाकाय तुकडे बाहेर पडून वाहू लागले आहेत. या हिमखंडांचा आकार तीन फुटबॉल मैदानांच्या क्षेत्रफळाएवढा (लांबी सुमारे ३८० मीटर, रुंदी ३५० चौरस मीटर) आहे. टोरेस डे पॅने येथील राष्ट्रीय उद्यान ग्लेशियल लेकमधून हे हिमखंड ७ मार्चपासून विलग झाले. गेल्या काही वर्षांत वातावरण बदलाचा परिणाम दिसून येत आहे, असे मत क्लायमेट चेंज एरिया ऑफ चिली अंटार्क्टिक इन्स्टिट्यूटच्या तज्ञांनी व्यक्त केले.


  यापूर्वी १९९० मध्ये सर्वात जास्त भेगा दिसून आल्या होत्या. विशेष म्हणजे क्लायमेट चेंज परिषदेचे यजमानपद यंदा चिलीकडे आहे. डिसेंबरमध्ये (कॉप २५) ही परिषद होईल.याच दरम्यान ही घटना घडली आहे.


  हिमखंडामुळे जहाज रोखले..
  हिमनदीतून वाहत आलेल्या १७ किमींच्या हिमखंडामुळे अधिक अध्ययनासाठी जाणाऱ्या संशोधकांच्या चमूला जहाजाचा पुढील प्रवास थांबवावा लागला. आता सखोल माहितीसाठी जहाज त्याच भागात मुक्कामी आहे.. दक्षिण शेटलँड आइसलँडमध्ये हा बर्फाचा महाकाय तुकडा आहे. हिमनदीतील भेग १७ हजार किमी लांबीची आहे.


  हिमालयीन संकट : एक तृतीयांश हिमनदी वितळेल
  हिंदुकुश पर्वत क्षेत्रातील हिमालयासंबंधीच्या एका अभ्यासानुसार जागतिक तापमानात शतकाच्या उत्तरार्धात २.१ अंशांनी वृद्धी होईल. त्याचा फटका हिमालयातील हिमनद्यांवर होऊ शकतो. त्यातून एक तृतीयांश हिमनद्या वितळू शकतात. त्यामुळे हिमालयात राहणारे २५ कोटी व हिमालय परिसरातील १६५ कोटींच्या लोकसंख्येवर त्याचा दुष्परिणाम होईल. सन २१०० पर्यंत हिमालयाच्या दोन तृतीयांश हिमनद्या वितळतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या वाढू शकतात.

Trending