Home | Business | Personal Finance | idbi bank now private says RBI

आयडीबीआय आता खासगी बँक; रिझर्व्ह बँकेची घोषणा

वृत्तसंस्था | Update - Mar 15, 2019, 11:25 AM IST

बँकेतील 51 टक्के भागीदारी एलआयसीने केली होती खरेदी   

  • idbi bank now private says RBI

    मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बँक आयडीबीआय आता खासगी बँक असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. एलआयसीच्या वतीने या बँकेचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जानेवारीमध्ये एलआयसीने आयडीबीआय बँकेतील ५१ टक्के भागीदारी खरेदी केली होती. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात सांगितले की, एलआयसीच्या वतीने ५१ टक्के भागीदारी खरेदी करण्यात आल्यानंतर २१ जानेवारी २०१९ पासून आयडीबीआयला खासगी बँकेचा दर्जा देण्यात आला आहे.


    रिझर्व्ह बँकेने आयडीबीआयला तत्काळ सुधारणांच्या (पीसीए) श्रेणीमध्ये ठेवले होते. यामध्ये टाकण्यात आलेल्या बँकेवर मोठे कर्ज देणे, शाखांची संख्या वाढवणे, पगारात वाढ करणे आदींवर बंदी असते. खराब प्रदर्शन असलेल्या बँकांना पीसीएअंतर्गत ठेवण्यात येते. सुधारणा योजनेअंतर्गत आयडीबीआयने एलआयसीमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. आता बँकिंग आणि विमा अशा दोन्ही सेवा बँकेला देता येतील. दीर्घ काळासाठी बँक आणि एलआयसी दोन्हींची गुंतवणुकीची योजना असेल. दोन्ही एकमेकांच्या साधनांचा उपयोग करू शकतील. या साधनांमध्ये रिअल इस्टेट, व्यावसायिक आणि निवासी भूखंड, शाखा, परिसर, एटीएम आणि डिजिटल मार्केटिंग आदींचा समावेश आहे.


    बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये ४१८५.४८ कोटी रुपयांचा तोटा दाखवला होता. एनपीए वाढल्यामुळे हा ताेटा नोंदवण्यात आला होता. ३१ डिसेंबर २०१८ रोजी बँकेचा एनपीए २९.६७ टक्क्यांवर पोहोचला होता.

Trending