Home | Maharashtra | Vidarva | Akola | Identification of Asif khan by T-shirts

पायावर झालेल्या सर्जरीचे व्रण, अंगातील टी-शर्टवरून पटली आसीफखानची ओळख

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 11:20 AM IST

- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते अासिफ खान मुस्तफा खान यांचा मृतदेह अखेर अाठ दिवसानंतर २४ अाॅगस्ट राेजी दहिह

 • Identification of Asif khan by T-shirts

  अकाेला- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते अासिफ खान मुस्तफा खान यांचा मृतदेह अखेर अाठ दिवसानंतर २४ अाॅगस्ट राेजी दहिहांडा परिसरातील वडद ब्रम्हपुरीजवळच्या नदी पात्रात अाढळून अाला. आसिफ खान यांच्या पायावरील प्लास्टिक सर्जरी व त्यांच्या अंगातील टी-शर्ट वरून मृतदेह आसिफ खान यांचा असल्याची ओळख पटली. शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा आसिफखान यांच्यावर वाडेेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.


  अासिफ खान हे १६ अाॅगस्ट राेजी रात्री घरून मूर्तिजापूर येथे जाण्यासाठी निघाले हाेते. ते प्रथम अकाेल्यात गेले. काही वेळ थांबल्यानंतर ते मूर्तिजापूरच्या दिशेने निघाले. मात्र ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा डाॅ. साेहेल खान यांनी बाळापूर पाेलिस स्टेशनला तक्रार नाेंदवली हाेती.दरम्यान, मृतदेहाचा पूर्णा नदीच्या पात्रात शाेध घेण्यात येत हाेता. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. मात्र त्यांना जीवे मारून मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात फेकून देण्यात अाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पाेहाेचले हाेते. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) खुनाच्या दिशेने तपासही सुरु केला हाेता.


  याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वाशीमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती अनिल गणेशपुरे तिचा मुलगा वैभव, बहिणीचा मुलगा गोलू उर्फ स्वप्निल वानखडे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आसिफ खान यांचा गळा दाबून खून करून मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुली दिली होती. त्याच दिशेने स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला.


  असा लागला शाेध
  वळद गावाकडून पूर्णा नदीपात्रात एक मृतदेह वाहत जात असल्याचे पोलीस पाटलांना दिसला. याबाबतची माहिती दहीहांडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप देशमुख यांना दिली. पोलिसांनी राेहण्याजवळील ब्रम्हपूरी गावाच्या काठावर ब्रह्मपुरी परिसरात धाव घेतली. निरीक्षणाअंती पात्रात मृतदेह असल्याची खात्री झाली. त्यानंतर याबाबतची माहिती संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देण्यात अाली. त्यांनीही पथकासह तातडीने धाव घेतली. काही वेळाने ब्रह्मपुरी परिसरातील ग्रामस्थांनी मृतदेह नदीकाठावर काढून ठेवला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे उपस्थित हाेते.


  रविवारी झाले हाेते शाेध कार्य सुरू
  मृतदेहाचा पूर्णा नदीपात्रात शाेध घेण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाला रविवारी पाचारण करण्यात अाले हाेते. दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात विकी साटोटे, धीरज राऊत, महेश साबळे, ऋषिकेश तायडे, ऋतिक सदाफळे, गोविंदा ढोके यांनी हे कार्य केले. मृतदेहाच्या शाेधासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात अाली.


  अशी झाली खात्री
  आसिफखान यांनी घटनेपूर्वी भुरकट रंगाचा शर्ट परिधान केला हाेता. या टी-शर्टवर बारीक लाईन्स हाेत्या. तसेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रियेचे व्रणही हाेते. या वर्णनावरून त्यांची अाेळख पटली. पोलिसांसह मृतकाच्या नातेवाइकांनी ओळख पटवल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास साेडला अाहे.


  खुनाचे गुन्हे दाखल!
  शवविच्छेदन अहवालावरून मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये खुनाच्या गुन्ह्याचे कलम भारतीय दंडविधान संहिता ३०२, ३४, पुरावा नष्ट करण्याचे कलम २०१ नुसार ज्योती गणेशपुरे, वैभव गणेशपुरे, स्वप्निल उर्फ गोलू वानखडे व इतर तिघांवर गुन्हे दाखल होऊन तपास होणार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांनी दिली.

Trending