Gadget News / आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांविरोधात मोहिम, व्हॉट्सअॅप बंद करणार त्यांचे अकाउंट

डिसेंबर 2019 पासून हे सुरू होईल, 30 दिवसात 20 लाख युझर्स बॅन होतील
 

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 05:02:00 PM IST

सॅन फ्रांसिस्को- ग्लोबल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आता मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने आक्षेपार्य पोस्ट आणि मेसेजमध्ये अपशब्द वापरणाऱ्या युझर्सवर लक्ष ठेवणार आहे. तसेच अनेकवेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे अकाउंट डिलीट केले जातील. हे तंत्रज्ञान डिसेंबर 2019 पासून सुरू होईल. यामुळे 30 दिवसांत 20 लाख युझर्सचे अकाउंट डिलीट केले जातील.


कडक कारवाई करण्याचा निर्णय
कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. जगभारत 150 कोटी व्हॉट्सअॅप युझर्स आहेत. फेसबुकच्या अंतर्गत काम करणारी कंपनी व्हॉट्सअॅपने शनिवार सांगितले की- आम्ही हे तंत्रज्ञान खासगी मेसेज पाठवण्यासाठी तयार करत आहोत. व्हॉट्सअॅपला भरमसाठ मेसेज पाठवणे आणि दुरुपयोग करण्यासाठी बनवले नाहीये. ऑटोमेटेड मेसेजिंगला थांबवण्यासाठी कारवाई केली जाईल, या अंतर्गत दर महिन्याला 20 लाख अकाउंट डिलीट केले जातील.

X
COMMENT