आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Identify Illnesses On The Soles Of The Feet, Also Treat Them On Time

पायाच्या तळव्यावरुन ओळखा आजार, वेळीच उपचारही करा

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाचे तळवेदेखील आपल्या आरोग्याविषयी खूप काही सांगत असतात. चला तर मग जाणून घेऊया पायांवरुन आपण आजार कसे ओळखू शकतो आणि त्या आजारांपासून कसे दूर राहू शकतो...

तळवे थंड होणे
हा हायपो-थायरॉयडिझमचा संकेत असॉ शकतो. थायरॉइडमुळे हॉर्मोन्सच्या ग्रंथीचे प्रमाण कमी होते. तेव्हा असे पाय होतात. रेनॉउड्ज आजारामध्येदेखील हातापायांची बोटे गार पडतात.

काय करावे- थकव्यासोबतच स्नायूमध्ये वेदना असतील तर हायपो थायरॉयडिझमची शक्यता असते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर रेनॉउड्स हा आजार निघाला तर जास्त गरम किंवा जास्त थंड तापमानापासून दूर राहा.

नखांचा आकार आणि रंग बदलणे
रक्तात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे नखांच्या आकार आणि रंगात बदल होतो. परंतु हे लक्षणे फुप्फुसे, हृदय किंवा पोटासंबंधित आजारामुळेदेखील होऊ शकते.

काय करावे - हृदयासंबंधित लक्षणे गंभीर असू शकतात. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी केली पाहिजे. सोरायसीस असेल तर लाइट थेरपीचे औषध घेतले पाहिजे.

पायांवरील केस गायब होणे
पायांच्या बोटांना सुरळीत रक्तपुरवठा झाला नाही तर असे होते. यामुळे पायावरील केस गायब होतात किंवा केस उगवत नाहीत. या स्थितीमध्ये तळवे पांढरे, लाल किंवा जांभळे दिसू लागतात. हा ब्लड सर्क्युलेशन किंवा शरीरासंबंधित आजार असू शकतो.

काय करावे- पायऱ्या चढताना वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा. ते ब्लड सर्क्युलेशन आणि कॉलेस्टेरॉलची औषधी देतील.

अल्सर किंवा आखडणे
डायबिटीजमुळे हे होऊ शकते. तळवे अाखडणे, वेदनेची जाणीव नसणे, लाल रंगाचे दाणे येणे हे टाइप-2 डायबिटीजचे लक्षण आहे. तसेच बोटे आखडणे, मुंग्या येणे हे तळव्यातील रक्तपेशी अशक्त होण्याचे संकेत आहेत.

काय करावे - पायात असे लक्षण दिसत असेल, तहान लागत असेल, थकवा जाणवत असेल, वजन कमी होत असेल तर लवकर डॉक्टरांना दाखवावे.

पायांच्या हांडामध्ये वेदना होणे
पायांच्या हांडामध्ये वेदना होणे हा संधिवात असू शकतो. हातापायांचे लहान लहान सांधे यामुळे सर्वात अगोदर प्रभावित होतात. सकाळच्या वेळी जास्त वेदना होत असतील किंवा काही तास वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. 

काय करावे - सांध्यामध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांना दाखवण्यात उशीर करू नका.