गरुड पुराण / पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवणे बंद केल्यास आयुष्य बरबाद होते

सुखी आणि यशस्वी जीवनासाठी धैर्य बाळगावे आणि जोडीदाराची काळजी घ्यावी

दिव्य मराठी वेब

दिव्य मराठी वेब

Jun 09,2019 12:20:00 AM IST

हिंदू धर्मामध्ये एकूण 18 पुराण सांगण्यात आले असून यामध्ये गरुड पुराणाचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः गरुड पुराणाचा पाठ एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केला जातो. या पुराणामध्ये जन्म आणि मृत्यूशी संबंधित रहस्य सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गरुड पुराणात पाप आणि पुण्य कर्माशी संबंधित सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. या पुराणातील आचार कांडाच्या नीतिसार अध्यायामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाच्या नीती सांगण्यात आल्या आहेत. येथे नीतिसारनुसार जाणून घ्या, अशा 4 गोष्टी ज्यामुळे जीवनात अडचणी वाढू शकतात. आयुष्यात अशा गोष्टी घडू लागल्यास प्रत्येकाने सावध राहणे आवश्यक आहे...


जोडीदाराच्या विश्वासाला तडा
सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पती, पत्नी दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास असणे. या विश्वासाला तडा गेल्यास नाते तुटायला वेळ लागत नाही. यामुळे आपल्या जोडीदाराच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी. जर एखाद्या गैरसमजुतीमुळे असे घडले तर शांततेने चर्चा करून जोडीदाराला सत्य समजावून सांगावे.


जोडीदार अस्वस्थ होणे
पती-पत्नी, दोघांचेही कर्तव्य आहे की, एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जर तुमचा जोडीदार आजारी असेल तर सर्वात पहिले त्याच्याकडे लक्ष द्यावे. आजारपणामध्ये जोडीदाराची विशेष काळजी घेतली तर प्रेम आणखी वाढते. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघांनीही स्वस्थ राहणे आवश्यक आहे.


लहान व्यक्तीकडून अपमान
घर-कुटुंब असो किंवा कामाचे ठिकाण, प्रत्येक ठिकाणी मान-सन्मान सर्वांनाच हवा असतो. जर एखादा वयाने आणि पदाने मोठा असलेला व्यक्ती आपल्याला अपमानास्पद वागणूक देत असेल तर ते सहन केले जाऊ शकते, परंतु एखादा कमी वयाचा आणि आपल्या अधीन काम करणारा व्यक्ती अपमान करत असेल तर खूप दुःख होते. अशावेळी राग येणे स्वाभाविक आहे, परंतु संयम बाळगावा. क्रोध आणि आवेशात कोणताही निर्णय घेऊ नये. यामुळे अडचणी जास्त वाढतात.


वारंवार अपयश पदरी पडणे
कोणत्याही कामामध्ये यश मिळणार की नाही, हे कामाच्या सुरुवातीलाच समजू शकत नाही. यश मिळाले तर उत्तमच आहे, परंतु वारंवार अपयश पदरी पडत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. अपयश हेच सांगते की, कामामध्ये काहीतरी उणीव राहिली आहे. असे घडले तर चूक शोधून पुन्हा कामाची सुरुवात करावी. अपयशातून शिकून पुढे निघाल्यास यश नक्की मिळते.

X
COMMENT