आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेब असते तर 'पटक देंगे' म्हणण्याची अमित शहांनी हिंमतच केली नसती : भुजबळ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासारखे कोणीही शिवसेनेला 'पटक देंगे' म्हणण्याची हिंमत करू शकले नसते, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना-भाजपच्या 'नातेसंबंधा'कडे लक्ष वेधत टीका केली. शिवसेना ही संघटना असून ती कधीच संपणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या संघटनकाैशल्याचेही काैतुक केले. 

 

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचे रविवारी राष्ट्रवादीच्या वतीने सिनेमॅक्स चित्रपटगृहात विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भुजबळ येताच तुतारी वाजवत, ठाकरे व भुजबळ यांच्या नावाचा जयघोष करत जुन्या शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. चित्रपट पाहिल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेची त्यावेळची आक्रमकता आणि आताची स्थिती वेगळी आहे. माणसे बदलली. अनेक जण शिवसेना संपेल असे म्हणत होते, परंतु केवळ मीच 'शिवसेना संपणार नाही', असे म्हटल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. शिवसेना विशिष्ट भागातच नसून तळागाळात पोहचली असल्याने ती संपणे शक्यच नाही. सद्यस्थितीतही पक्षाचे संघटन मजूबत आहे. जवळपास ३२ वर्षे शिवसेनेत काम केल्याने चित्रपटातील विविध आंदोलने बघून जुन्या स्मृती जाग्या झाल्या. ठाकरे यांचे कार्य एका चित्रपटातून जनतेसमोर मांडणे शक्य नाही. त्यासाठी अनेक चित्रपटांची मालिका काढावी लागेल. 
 

बातम्या आणखी आहेत...