आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर भाजप आमदार बलात्काराचा आरोपी असेल, तर त्याला प्रश्न विचारू नका- राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज(सोमवार) भाजपवर निशाना साधत, मोदींच्या "बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ" योजनेवर टोमणा मारला. त्यांनी उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये बलात्कार पीडिता, तिचे वकील आणि कुटुंबाचा अपघात होण्यावर प्रश्न उपस्थित केले. राहुल यांनी ट्वीट केले, ''देशात महिलांसाठी नवीन शिक्षा बुलेटिन जारी झाला आहे. जर भाजप आमदार बलात्कारात आरोपी असेल, तर त्याला कोणताही प्रश्न विचारला जात नाही."

 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, बलात्कार पीडिता, तिची काकू, मामी आणि वकीलांचा रायबरेलीमध्ये अपघात झाला. ते सर्वजण तुरुंगात असलेल्या आपल्या काकाला भेटायला जात होते. या अपघातात काकू आणि मामीचा मृत्यू झाला तर पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले. 2017 मध्ये पीडित अल्पवयीन मुलीने आमदार कुलदीप सेंगरवर बलात्काराचा आरोप लावला होता. त्यानंतर तिने मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...