आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If Faced With Positivity And Understanding, It Is Possible To Get Out Of Trouble

सकारात्मकता आणि समजूतदारपणे सामना केल्यास कोणत्याही संकटातून बाहेर पडणे शक्य

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

एका शेतकऱ्याकडे एक म्हातारे गाढव होते. शेतात काही सामान नेण्यासाठी आणि छोटे-मोठे ओझे वाहण्यासाठी शेतकरी त्या गाढवाचा उपयोग करत होता. एके दिवशी ते गाढव शेतातील एका मोठ्या खड्ड्यात पडले. त्या निर्दयी शेतकऱ्याने गाढवाला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केले नाही उलट त्याने आपल्या शेजाऱ्यांना बोलावले आणि म्हणाला की, आपण सर्वजण मिळून खड्डयात माती टाकूयात जेणेकरून म्हाताऱ्या गाढवाला तिथेच पुरून, त्याची कष्टातून मुक्तता करू.  गाढव हे एकूण अस्वस्थ झाले. परंतु नंतर जेव्हा शेतकरी आणि त्याचे शेजारी फावड्याने माती काढून खड्ड्यात टाकू लागले आणि माती-दगडामुळे त्याच्या पाठीला जखमा होत असताना त्याच्या मनात एक विचार आला. त्याने विचार केला की, जेव्हा फावड्यातून माती त्याच्यावर पडेल, तेव्हा तो पाठ हलवून मातीला झटकून टाकेल. या प्रकारे खाली पाडलेल्या मातीवर तो पुन्हा उभा राहील. त्याने अगदी असेच केले. माती-दगडांच्या प्रत्येक प्रहारासोबत तो पाठ हलवून मातीला खाली पाडत गेला. तो स्वत:ला प्रेरीत करण्यासाठी हेच तंत्र पुन्हा पुन्हा वापरत गेला. त्याच्यावर माती-दगड कितीही जोरात पडले किंवा परिस्थिती त्याला कितीही हताश वाटली, तरी ते म्हातारे गाढव भीतीवर ताबा मिळवत तेच करत राहिले. वाईटरीत्या जखमी आणि थकलेल्या अवस्थेत गाढवाने विजयाच्या भावनेने खड्ड्याच्या बाहेर पार पाऊल ठेवले. त्याच्यावर पडणारी माती त्याला खड्डातच पुरेल असे वाटत होते. परंतु ज्या प्रकारे त्याने संकटाचा सामना केला त्यामुळेच हे शक्य झाले. हेच जीवन आहे. आपण सर्व समस्यांचा सामना कराल तर सकारात्मकपणे त्याचे उत्तर द्या. भीती, कटुता अथवा लाचारीमुळे आपण हार मानायला नको.

धडा : कठीण परिस्थितीत आपण घाबरून जातो. मदत न मिळाल्यास कटुता येते आणि लाचारी आपल्याला पंगू बनवते. या भावनांशिवाय सकारात्मकता आपल्याला मार्ग दाखवते.

बातम्या आणखी आहेत...