आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज भरताना चारपेक्षा अधिक गेले तर गुन्हा... आजपासून नामनिर्देशनपत्र उपलब्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारासह चार जणांनाच उपस्थित राहता येईल. त्यापेक्षा जास्त जण आढळून आल्यास उमेदवारावर आचासंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी सोमवारी दिले. 

 

महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची निवडणूकविषयक कामकाजाबाबत द्विवेदी यांनी सोमवारी स्थायी समिती सभागृहात बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. द्विवेदी म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नियुक्त अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन त्यांच्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रात भेट देउन त्यांच्या हद्दीची चांगल्या प्रकारे माहिती घ्यावी. विहित मुदतीत नामनिर्देशन पत्रे दाखल करुन घ्यावीत. नामनिर्देशन पत्रे हे ऑनलाईन व हार्डकॉपी अशा दोन्ही स्वरुपात दाखल करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे व छाननी करणे ही कामे निवडणूक निर्णय अधिकारी यांची जबाबदारी आहे. ती त्यांनी स्वतः पार पाडावी. निवडणूक कामकाजात दाखल होणारी सर्व कागदपत्रे विभागवार जतन करुन ठेवावीत. 


प्रत्येक नामनिर्देशन सादर करण्याच्या प्रक्रियेचे, तसेच माघारीचे व्हिडीओ चित्रिकरण करावे. जात पडताळणीसाठी पत्र देण्याकरता महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना अधिकार देण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारात उमेदवार व त्यासोबत तीन अशा चार व्यक्तींना उपस्थित राहता येईल. त्यापेक्षा अधिक व्यक्ती उमेदवार बरोबर असल्यास त्या उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा त्वरित दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. 
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्याबरोबर शपथपत्रातील कोणताही रकाना कोरा ठेवू नये. शपथपत्र पूर्ण भरलेले असावे. त्याचप्रमाणे उमेदवारांना त्याचे प्रभागातील विकासकामांबाबत त्यांचे नियोजनाची माहिती शपथपत्रात देणे आवश्यक आहे.

 

निवडणुकीकरिता सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली अाहे. निवडणुकीचे कामकाज टाळण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही द्विवेदी यांनी सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...