नवीन मोटार वाहन / वारंवार वाहतूक नियम तोडले तर वृद्धाश्रमात करावी लागणार सेवा

गरीब मुलांना शिकवा, धार्मिक स्थळी सेवाही

दिव्य मराठी

Sep 22,2019 08:11:00 AM IST

शरण पांडेय

नवी दिल्ली - नव्या मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर कुणी वारंवार वाहतूक नियम मोडले तर त्याच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सेवा करण्याची शिक्षा संबंधिताला सुनावली जाईल. हा कायदा लागू झालेला असल्याने रस्ते परिवहन मंत्रालयाने याची अधिसूचना काढली असून आता संबंधित अधिकारी किंवा वाहतूक पोलिसही नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा देऊ शकतील. देशात वर्षाकाठी साधारणपणे ८ कोटी चालान फाडले जातात. बहुतांश वाहनचालक एकदा दंड बसला की नियमांचे पालन करतात. मात्र, अनेक जण याबाबत गांभीर्य बाळगत नाहीत. त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून परिवहन मंत्रालयाने अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी सेवा करण्याची शिक्षा करण्यासाठी कायदा केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे, की महसूल वाढवण्यासाठी नव्हे, तर लोकांचा जीव वाचावा म्हणून हा नियम केलेला आहे.

अशी करावी लागेल सेवा
चौकात वाहतूक नियमांचे पालन करायला लावणे, वृद्धाश्रमात सेवा करणे, गरीब मुलांना शिकवणे, नशेखोरीविरुद्ध जागरुकता निर्माण करणे, समाजकार्यात सहभागी होणे, घरोघर जाऊन वाहतूक नियम समजावून सांगणे, धार्मिक स्थळांवर सेवा.

X
COMMENT