आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव आला तर हे वर मागत नाहीत, त्याच्याशी चर्चा करतात!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुज खरे
आजकाल लोक बुद्धिजीवींच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे हैराण आहेत. साहित्यातील बुद्धिजीवी, स्मशानातील बुद्धिजीवी... आमचे बुद्धिजीवी, त्यांचे बुद्धिजीवी. पूर्वी बुद्धिजीवी लोक रस्ता दाखवायचे. आता त्यांना बघून कोणीतरी रस्ता बदलतो. बुद्धिजीवी प्रगटणे हा खरं तर घनघोर प्रक्रियेचा परिणामच.आपण बुद्धिजीवी असल्याचे समजताच अशा विभूती विचारांना आपलं देणं बनवू लागतात. आपल्या ज्ञानाचा मारा समोरच्यावर सुरू करतात. तो भांबावून पळू लागला, तर त्याला पुन्हा बसवून आणखी विचार लादतात. प्रत्येकाचं तोंड ज्ञानाच्या नखांनी ओरबाडतात. दुसऱ्याचं डोकं खावून आपल्या चेहऱ्यावर चमक आणणाऱ्याला आता या जगात बुद्धिजीवी मानले जाते. ही अवस्था अत्यंत टोकाची आणि अत्याचारी स्वरूपाची आहे. मागच्या जन्माच्या कर्मामुळे काही लोक बुद्धिजीवी होतात, तर याच कर्मामुळे काही जणांवर त्यांना झेलत राहण्याची वेळ येते. शेवटी ज्याचं त्याचं नशीब! आपण तरी काय करणार..?


विचारांचं बंडल बांधण्यात इतरांपेक्षा बुद्धिजीवी जास्त कुशल असतो. जुन्या लोकांच्या उदाहरणांचे पाणी घालून तो विचारांची माती मळतो. संधी मिळाली तर ती पायांनीही तुडवतो. जुने विचार असेच तुडवायचे असतात, हे त्याला माहीत असते. तुडवा! मलिदा बनवा! त्यामुळं आमचे नवे विचार तरी चलनात येतील. जुने तुडवल्याशिवाय नव्यांचा ठोक पुरवठा कसा होणार? सुधारणा होवो ना होवो, विचार फेकलेच पाहिजेत, हे बुद्धिजीवी जाणून असतो. प्रत्येक विषयाची चिंता करणे, हाच त्यांचा फुल टाइम जॉब. देशाच्या हाती ज्ञानाची पुडी ठेवणे, हाच त्यांचा धंदा. ज्ञानदान करताना तो समाधी अवस्थेत जातो. त्या स्थितीत त्याला दोन्ही किडन्या मागितल्या, तरी तो नकार देणार नाही. जगाच्या कल्याणाची इतकी तळमळ असते की स्वत: देव वर द्यायला आला, तरी तो मागण्याऐवजी त्यालाच सल्ला देवू लागेल. चार- सहा तास त्याचेही डोके खाईल.


देशापुढच्या प्रत्येक समस्येने बुद्धिजीवी अस्वस्थ होतो. त्याचं मन खदखदू लागतं... 'आम्ही इथं बसलोय अन् भाषण तो कालचा पोरगा देतोय, आमची इतक्या वर्षांची तपस्या वाया गेली. आम्ही नव्या देशाचे नवे प्रश्न सोडवतोय. आमचा प्रखरपणा अशाने क्षीण होत जाईल. तपस्या निष्फळ जाईल. ज्ञान आहे तर संधी नाही, संधी आहे तर ती दुसऱ्याला. अशात सगळ्याच समस्या सुटल्या, तर आमचं काय होणार? हे देवा! काहीतरी कर. आमच्यासाठी कोणता तरी मुद्दा तयार कर. ज्ञान दिलं नाही तर जगणं अशक्य होईल. संधी दे! देवा, संधी दे!' बुद्धिजीवी माणसाचं हे आक्रंदन धरतीलाही भेदत जातं, पण कुणाला कळत नाही. लोक आपापल्या कामाला लागतात. देश आपल्या कामाला लागतो. तेव्हा बुद्धिजीवी आभाळाशी संवाद साधू लागतो..


अनुज खरे
फीचर हेड, दैनिक भास्कर
 

बातम्या आणखी आहेत...